‘सांस्कृतिक कलादर्पण’चा रौप्यमहोत्सव
कला क्षेत्रातील २५ ‘बाप माणसांचा’ सत्कार
चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत ‘सांस्कृतिक कलादर्पण २०२३’ सोहळा यंदा २ मार्च रोजी होणार असून यंदा या सोहळ्याचे २५वे वर्ष आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने कला क्षेत्रातील २५ ‘बाप माणसांचा’ यावेळी सर्वश्रेष्ठ ‘कलागौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
कला क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलावंताना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार सुरेश जयराम ( ज्येष्ठ लेखक ), सुबोध गुरुजी ( ज्येष्ठ पोस्टर डिझायनर ), दत्ता थिटे (ज्येष्ठ संगीतकार ), प्रकाश भेंडे ( ज्येष्ठ निर्माते आणि अभिनेते ), राम अल्लम ( ज्येष्ठ कॅमेरामन), रवी दिवाण ( ज्येष्ठ फाईट मास्टर ), शकुंतला नगरकर ( जेष्ठ लावणी कलावंत ), विजय कुलकर्णी ( जेष्ठ चित्रपट वितरक आणि टूरिंग टॉकीज मालक ), उल्हास सुर्वे (ज्येष्ठ बॅकस्टेज आर्टिस्ट), सदानंद राणे (ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक), शिवाजी पाटील (ज्येष्ठ शाहीर), सचिन चिटणीस (ज्येष्ठ पत्रकार), राजन वर्धम (ज्येष्ठ रंगभूषाकर), पितांबर काळे (ज्येष्ठ दिग्दर्शक), पुंडलिक चिगदुळ (ज्येष्ठ लाइटमन दादा), व्ही. एन. मयेकर (ज्येष्ठ संकलक), मंगेश कुलकर्णी (ज्येष्ठ गीतकार), मिलिंद आस्टेकर (ज्येष्ठ निर्मिती व्यवस्थापक), कैलास नारायणगांवकर (ज्येष्ठ तमाशा फड मालक), हरि पाटणकर (ज्येष्ठ बुकिंग क्लार्क), बाळू वासकर (ज्येष्ठ उपहार व्यवस्थापक), बबन बिर्जे (ज्येष्ठ स्पॉट दादा), अनंत वालावकार (ज्येष्ठ नेपथ्यकार), जयवंत देसाई (ज्येष्ठ प्रकाश योजनाकार), मोहन आचरेकर (ज्येष्ठ कलादिग्दर्शक) यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर सांस्कृतिक कलादर्पणतर्फे चित्रपटांची स्पर्धा घेण्यात आली त्यात एकूण ४२ सिनेमांनी भाग घेतला होता. त्यातून अंतिम चित्रपट महोत्सवासाठी पुढील १० सिनेमांची निवड करण्यात आली असून हा महोत्सव रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे २८ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत होणार आहे. पिकासो, मदार, ताठ कणा, दगडी चाळ २, धर्मवीर, बालभारती, झोलीवुड, वाळवी, इंटरनॅशनल फालमफोक, समायरा या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. रमेश मोरे, अशोक कुलकर्णी, मनोहर सरवणकर, सुनील खेडेकर, विजय राणे यांनी चित्रपटांचे परीक्षण केले, असे संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी सांगितले आहे.
‘सांस्कृतिक कलादर्पण’चा रौप्यमहोत्सव सोहळा संपन्न
पडद्यावरील, पडद्यामागील २५ कलावंताचा भव्य सत्कार घडला.
चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत ‘सांस्कृतिक कलादर्पण २०२३’चा दिमाखदार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यंदा या सोहळ्याचे २५वे वर्ष आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने कला क्षेत्रातील २५ ‘बाप माणसांचा’ यावेळी सर्वश्रेष्ठ ‘कलागौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी कलाक्षेत्रातील, अन्य क्षेत्रांतील अनूप जलोटा,दिलीप सेन,विजय पाटकर, अनंत जोग,प्रमोद पवार,अदिती सारंगधर, शिरिष लाटकर,रमेश मोरे,संदीप देशपांडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
कला क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलावंताना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार सुरेश जयराम ( ज्येष्ठ लेखक ), सुबोध गुरुजी ( ज्येष्ठ पोस्टर डिझायनर ), दत्ता थिटे (ज्येष्ठ संगीतकार ), प्रकाश भेंडे ( ज्येष्ठ निर्माते आणि अभिनेते ), राम अल्लम ( ज्येष्ठ कॅमेरामन), रवी दिवाण ( ज्येष्ठ फाईट मास्टर ), शकुंतला नगरकर ( जेष्ठ लावणी कलावंत ), विजय कुलकर्णी ( जेष्ठ चित्रपट वितरक आणि टूरिंग टॉकीज मालक ), उल्हास सुर्वे (ज्येष्ठ बॅकस्टेज आर्टिस्ट), सदानंद राणे (ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक), शिवाजी पाटील (ज्येष्ठ शाहीर), सचिन चिटणीस (ज्येष्ठ पत्रकार), राजन वर्धम (ज्येष्ठ रंगभूषाकर), पितांबर काळे (ज्येष्ठ दिग्दर्शक), पुंडलिक चिगदुळ (ज्येष्ठ लाइटमन दादा), व्ही. एन. मयेकर (ज्येष्ठ संकलक), मंगेश कुलकर्णी (ज्येष्ठ गीतकार), मिलिंद आस्टेकर (ज्येष्ठ निर्मिती व्यवस्थापक), कैलास नारायणगांवकर (ज्येष्ठ तमाशा फड मालक) हरि पाटणकर,अनंत वालावलकर(ज्येष्ठ नेपथ्यकार),जयवंत देसाई(ज्येष्ठ प्रकाश योजनाकार),मोहन आचरेकर(जेष्ठ कलादिग्दर्शक) यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सांस्कृतिक कलादर्पण बाप माणूस सोहळ्यात चंद्रशेखर सांडवे म्हणतात; “माझी एक सवय आहे मी मोठ्यांबरोबर कमी प्रमाणात वावरतो, पण या रंगमनची कलाकार बरोबर, लेखक दादा बरोबर पहिले रंगमंचावर गेल्यावर मी यांना जाऊन भेटतो, त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो, मला ती माणसं फार जवळची वाटतात. कारण काय होत हिच माणसं दुर्लक्षित होत जातात. मी मागील ५ वर्ष तुम्हाला माहित असेल नवीन उपक्रम सुरु केला आहे. वाढदिवसाचा, महाराष्ट्रामध्ये पहिले सकाळी सकाळी ७ वाजता पहिली पोस्ट पडते. फेसबुक, इंस्टाग्रॅम किंवा माझा व्हाट्सअप ग्रुप वर ती म्हणजे कलाकारांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मधील पहिले आवर्जून एखाद्या मोठया कलाकाराला विसरत असेल म्हणजे विसरत नाही. मी पण चुकून सुद्धा माझ्याकडून असं होऊ देत नाही की एखादा बॅकस्टेज कलाकार आहे किंवा तंत्रज्ञ असेल त्यांचं पहिले पोस्ट तयार करतो आणि मग बाकीचे मोठ्यांचे तयार करतो आणि म्हणूनच वाटतं की हे सगळे मंडळी जर नसतीलना तर कोणतीही कलाकृती निर्माण होऊ शकत नाही. म्हणूनच मला अस वाटतंय आपण या बाप माणसांचा सत्कार करूया. माझ्या ७८ कमिटी मेम्बर्स या सगळ्यांचे मी आभार मानतो. ही सगळी मंडळी पाठीशी होती सगळी मंडळी कार्य करतात, मार्गदर्शन करतात, वेळोवेळी मला मदत करतात, त्यामुळे हा कार्यक्रम होतोय. १९९८ पुर्वी आधी असे सोहळे नव्हते. आणि मग नंतर २ वर्षांनंतर हे नामांकित पुरस्कार सोहळे सुरू झाले. आज त्याचं रूपांतर इंटरनॅशनल सोहळ्यांमध्ये झालं आहे. पण माझ्याकडे सुद्धा शॉर्टफिल्म होतो पण मला नाही आवडतं त्याला इंटरनॅशनल नाव द्यायला. कारण इंटरनॅशनल माझे रसिक माय बाप आहेत, माझे इंटरनॅशनल सहकारी आहेत, सांस्कृतिक सोहळ्याचे जे मानकरी आहेत या सगळ्यांनी मला भरभरुन प्रेम दिलं, सगळ्यात महत्त्वाचं मला इथे सांगावस वाटत खरंच सुखाची गोष्ट मित्रांनो, एवढं सगळं घडत असताना ज्या वेळेस आर्थिक राजकारण बिघडत तेव्हा आपल्या घरच्यांची साथ म्हणजे माझे आई वडील, माझी पत्नी आणि माझी मुलं यांचा मी ऋणी आहे, असे प्रतिपादन केले.