फॉल्स टीआरपी मुळे टीव्ही वाहिन्यांमध्ये खळबळ

“टीव्ही वाहिन्यांच्या फॉल्स टीआरपी रेटींगसाठी एक टोळी कार्यरत असून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ३० हजार बॅरोमीटर बसविण्यात आले आहेत. या मीटरची मुंबईत स्थापना हंसा नावाच्या संस्थेने केली होती. मुंबई पोलिसांचा असा दावा आहे की हंसांचे काही जुने कामगार ज्या ठिकाणी पीपल मीटर स्थापित होते त्या बऱ्याच घरात जायचे, ते लोकांना सांगायचे की तुम्ही २४ तास टीव्ही चालू ठेवा आणि एक निश्चित चॅनेल चालू ठेवा. यासाठी ते लोकांना पैसेही देत ​​होते. अशिक्षित लोकांच्या घरातही इंग्रजी वाहिन्या चालू होत्या. असा मुंबई पोलिसांचा दावा आहे.” अशी धक्कादायक माहिती मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यानंतर टीव्ही वाहिन्यांमध्ये खळबळ उडाली असून, टीआरपी म्हणजे नक्की काय आणि तो कसा मोजला जातो? त्याच प्रमाणे याचा फायदा तरी काय आहे? हे आपण आता पाहू.

ठराविक जागांवर विशिष्ट फ्रिक्वेन्सी मीटर्स जोडले जातात. या मीटवरून संबंधित भागात कोणती चॅनेल, कोणत्या मालिका व जाहिरात सर्वाधिक पाहिल्या जातात याच्या प्रत्येक मिनिटाच्या नोंदी असतात. या नोंदी इंडियन टेलिव्हिजन ऑडियन्स मेझरमेंट या संस्थेकडे पाठवल्या जातात. टीआरपीच्या आधारेच चॅनेल्स जाहिराती मिळवतात. डीटीएचद्वारे ग्राहक पसंतीची चॅनेल पाहतात; पण नव्या नियमानुसार जर ग्राहकांनी पसंतीच्या चॅनेलसाठी पैसे भरले, तर त्याचा फायदा चॅनेलला होणार, पण तसे न झाल्यास त्याचा फटकाही चॅनेल्स ला बसणार.

चॅनेलच्या जितका टीआरपी जास्ती तितकी चॅनेल्सची कमाई जास्ती ज्या चॅनेलचा टीआरपी कमी त्यांना जाहिराती कमी, पर्यायाने पैसे कमी. त्यामुळे चॅनेल चालवण्यासाठी टीआरपी खूप महत्वाचा असतो. टीआरपी वाढवण्यासाठी म्हणूनच सर्वच चॅनेल प्रयत्न करत असतात.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns