*मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघ, मुंबई च्या नवीन कार्यकारिणीची निवड*
*मुंबई, दि. १० ऑगस्ट २०२६* : मराठी रंगभूमीच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या *मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघ, मुंबई* च्या ऑगस्ट २०२६ ते जुलै २०३१ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी नवीन पदाधिकारी आणि कार्यकारिणीची निवड आज दि. १०/०८/२०२६, सोमवार रोजी *श्री. शिवाजी मंदिर, दादर बोर्ड रूम(दादर पश्चिम), मुंबई.* येथे दुपारी ०४:०० वाजता झालेल्या सभेत एकमताने करण्यात आली.
या सभेत खालील पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली:
*नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य*
१. *अध्यक्ष* : श्री. राहुल भंडारे
२. *उपाध्यक्ष* : श्री. ज्ञानेश महाराव
३. *प्रमुख कार्यवाह* : श्री. श्रीकांत तटकरे
४. *कोषाध्यक्ष* : श्री. संदीप विचारे
५. *सह कार्यवाह* : श्री. अजय विचारे
६. *सह कोषाध्यक्ष* : सौ. प्रिया पाटील
७. *सदस्य* : श्री. अशोक नारकर
८. *सदस्य* : श्री. प्रदीप कबरे
९. *सदस्य* : श्री. दिपक नलावडे
१०. *सदस्य* : श्री. संतोष पवार
११. *सदस्य* : श्री. शेखर दाते
*सल्लागार मंडळ – एकमताने निवड*
१. श्री. उदय धुरत
२. श्री. नवनाथ (प्रसाद) मच्छिंद्र कांबळी
३. श्री. संतोष भरत काणेकर
नवनियुक्त कार्यकारिणी आणि सल्लागार मंडळाच्या सर्व सदस्यांचे संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. पुढील ५ वर्षात मराठी नाट्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी आणि नाट्यव्यावसायिकांच्या हितासाठी संघ सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
श्रीकांत तटकरे., प्रमुख कार्यवाह. मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघ, मुंबई
































