चित्रपट चालणे अथवा पडणे हे प्रेक्षकांच्याच हाती – रितेश देशमुख

चित्रपट चालणे अथवा पडणे हे प्रेक्षकांच्याच हाती – रितेश देशमुख

तुम्ही कितीही चांगला चित्रपट बनवा त्याचा आशय त्याचे दिग्दर्शन कितीही उत्तम असुद्या मात्र तो चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाहीतर प्रेक्षक त्याच्या कडे पाठ फिरवतात म्हणून दिग्दर्शकाने, लेखकाने प्रेक्षकांची नाळ ओळखून चित्रपट बनवला पाहिजे. एखादा चित्रपट चालला म्हणून त्याच प्रकारचे चित्रपट आपण बनवत राहिलो तर प्रेक्षक ते बघणार नाहीत. एक चित्रपट पूर्ण बनून तो थिएटर मध्ये यावयास अंदाजे २ ते २.५ वर्ष लागतात त्यामुळे चित्रपट बनवतांना या अडीच वर्षाचा काळ लक्षात घेऊन बनवायला हवा. महाराष्ट्रामध्ये प्रथम हिंदी आणि नंतर मराठीला प्राधान्य मिळते, पण थिएटर मिळवण्यासाठी मराठीला इतर भाषांमधील डब चित्रपटांशीही झगडावे लागते. मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये आयोजित परिसंवादात अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुखने आपले मत मांडले.

रितेश पुढे म्हणाला, “अमेरिकेच्या तुलनेत आपल्याकडे खूप कमी थिएटर्स आहेत. जरी थिएटर्स संख्या वाढवली तरी तिथेही हिंदीचाच पगडा असेल. हिंदीत १० वर्ष झाल्यावर वडीलांनी मराठीत काम करण्याबाबत विचारल्यावर मुंबई फिल्म कंपनीची सुरुवात केली. सहा मराठी सिनेमांची निर्मिती केली. हिंदीतून सुरुवात झाल्याचा अभिमान आहे, पण मराठीत काम करत असल्याचा त्याहीपेक्षा जास्त अभिमान आहे.
मला ‘वेड’ची निर्मिती करायची होती. त्यासाठी तीन
दिग्दर्शकांशी संपर्क साधला. तिघेही बिझी होते. त्यामुळे
स्वत:च दिग्दर्शनात उतरण्याचा निर्णय घेतला.

केदार शिंदे म्हणाला “मला प्रथमच अशा परिसंवादा साठी आमंत्रण मिळाले आहे, पन्नास वर्षांमध्ये केवळ गणपती
आणि दिवाळी फेस्टिव्हलच पाहिले आहेत. कदाचित
मी बरेच व्यावसायिक चित्रपट बनवल्याने अशा
परिसंवादा साठी बोलावले गेले नसेल. मराठीची स्पर्धा
हिंदीसोबतच साऊथ आणि हॉलिवूडपटांशी आहे.
त्यामुळे ‘बाईपण’च्या वेळी आणि नंतरही मराठीची गाडी छान सुरू राहिल असे सांगता येत नाही. चांगले काम करत राहावे लागणार आहे.

सुजय डहाके म्हणाला की, माझे बरेच सिनेमे अगोदर
फेस्टिव्हलमध्ये यशस्वी झाले आणि प्रेक्षकांपर्यंत
पोहोचले. माझा ‘श्यामची आई’ ही बालपणातील
आठवणीतून आकाराला आला आहे. मराठी
चित्रपटांसाठी ओटीटी नाहीच. अॅमेझॉन, नेटफ्लिक्स
मराठी सिनेमे घेत नाहीत. त्यामुळे सिनेमागृहांच्या
संख्येसोबतच रिकव्हरी हा मराठीचा मोठा प्रॉब्लेम
आहे. यावर केवळ चर्चा होते, पण कोणीही हे गणित
सोडवत नाही. सिनेमा बघणे ही संस्कृती जपली पाहिजे.

आशिष बेंडे म्हणाला की, ‘आत्मफॅम्लेट’ हेच टायटल
का? हा प्रश्न अनेकांनी विचारला. सामान्य माणसाचे
आत्मचरित्र आहे, जे केवळ एका कागदावरही छापता
येऊ शकेल. त्यामुळे त्याला ‘आत्मफॅम्लेट’ हे शीर्षक
दिले. शीर्षकामुळे सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा
झाली. गाणी, कलाकार आणि कथेवर बरेच बोलले
गेले. मराठी चित्रपटाचे थिएटरमधील बिझनेसचे
गणित अनाकलनीय आहे. प्रेक्षक आणि मेकर्स
यांच्यातील मधल्या फळीने अॅनॅलिसीसपेक्षा
फॅक्ट्सचा विचार करायला हवा.

मामीमध्ये यंदा मराठी दिग्दर्शकांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. यात दिग्दर्शक वरुण नार्वेकर (1234), केदार शिंदे (बाईपण भारी देवा), रितेश देशमुख (वेड), सुजय डहाके (श्यामची आई) आणि आशिष बेंडे (आत्मफॅम्लेट) यांनी सहभाग घेतला होता.

+1
1.9k
+1
657
+1
98
+1
244
IPRoyal Pawns