“चित्रपट वगैरे म्हणजे सगळी टुकार पोरांची काम त्यापेक्षा कामधंदा बघा”असे, भाऊसाहेब शिंदेंना कोण म्हणाले.

“चित्रपट वगैरे म्हणजे सगळी टुकार पोरांची काम त्यापेक्षा कामधंदा बघा असे,” भाऊसाहेब शिंदेंना कोण म्हणाले.

‘ख्वाडा’ ‘बबन’ सारखे मास्टरपीस चित्रपट देणारे भाऊसाहेब शिंदे त्यांचा तिसरा चित्रपट ‘रौंदळ’ घेऊन येत आहेत, त्यानिमित्ताने ‘मुंबई न्यूज २४×७’ ने घेतलेली त्यांची मुलाखत त्यांच्या शब्दात……

“माझ्या आईला हे चित्रपट वगैरे प्रकार बिलकुल आवडत नाही. ही सगळी टुकार पोरांची काम असून त्यापेक्षा कामधंदा बघा धंदा पाण्याचे बघा असे ती नेहमी आम्हाला बोलते. म्हणूनच आज पर्यंत आमच्याकडे टीव्ही हा प्रकार नाही. तसा माझ्या भावाच्या लग्नात त्याला टीव्ही मिळाला होता. पण आईने तो बंद करायला लावला. ती बोलली टीव्ही ने माणसं बिघडतात त्यामुळे आपण टीव्ही वापरायचा नाही. या चित्रपटातील “भलरी….” हे गाणं बाबांना खूप आवडलं कारण ते त्यांच्या खूप जवळचं होतं. आई-बाबांच्या आयुष्यातील ‘ख्वाडा’ हा पहिला सिनेमा.
हे सांगताना भाऊसाहेब शिंदे यांच्या चेहऱ्यावर कोणताही अपराधीपणाचा भाव नव्हता उलट आपल्या आई-वडिलांचे प्रेम दिसून येत होते. ते पुढे म्हणतात जेव्हा मला काम नसतं तेव्हा मी शेती करतो आम्ही उसाचे बागायतदार असून आम्ही ऊस पिकवतो कांदा पिकवतो आमच्याकडे जनावर आहेत गाई आहेत आम्ही दुग्ध व्यवसाय सुद्धा करतो. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून चित्रपटात दाखवतात त्याच्याबरोबर उलट आहे. पण चित्रपट ही वेगळी कलाकृती आहे म्हणून जशी स्टोरी असेल त्याप्रमाणे काम करून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मी माणूस म्हणून वेगळा आहे तर कलाकार म्हणून वेगळा मात्र या दोन्ही गोष्टी जपायचा मी ऑटोकाट प्रयत्न करतो. पावसाळ्यात चिखल होतो तो आपण तूडवत जातो याला पश्चिम महाराष्ट्रात ‘रौंदळ’ असे म्हणतात शेतकऱ्यांच्या आयुष्यात होणारा चिखल तुडवून त्याचा नाश करणारा म्हणजेच ‘रौंदळ’ होय वर्षभर शेतात राबवून धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याला जर बाजारभाव मिळत नसेल तर ‘रौंदळ’ हा ठरलेलाच आहे. हे हा चित्रपट दर्शवतो.

मी शेतकरी असून आमचा या चित्रपटाचा दिग्दर्शक ही शेतकरीच आहे त्याचप्रमाणे चित्रपटाची हीरोइन देखील शेतकरीच असल्याने आपल्याला आम्हाला चित्रपटात बघितल्यावर शेतकरीच वाटू आणि त्यामुळेच आम्हाला अभिनेत्री ही शेतकरी हवी होती त्याप्रमाणे आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलींची ऑडिशन घेतली. नेहाच्या सुद्धा दोन ऑडिशन झाल्या पहिल्या ऑडिशनला तर नेहाला रिजेक्ट केले होते. पण नंतर तिची निवड झाली.

आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी घडत असतात आणि त्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात आहे असं जेव्हा वाटते तेव्हा शेतकऱ्यांची ही खदखद आपणच जगासमोर आणूया असे प्रकर्षाने जाणवते शेतकऱ्यांना बाजारभाव न मिळणे हे कोठेतरी अख्या सिस्टीमचे फेल्युलर आहे. हा फक्त महाराष्ट्राचा प्रश्न नसून युपी, बिहार, पंजाब, गुजरात, हरियाणा, दिल्ली अशा जिथे शेती जास्त होते तेथील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. म्हणूनच हा चित्रपट आम्ही हिंदीतही डब करतो आहे. चित्रपट करताना अडचणी आल्या नव्हे त्या येतातच आता चित्रपट करणं म्हणजे रोज एक लग्न करण्यासारखी मेहनत घ्यावी लागते. कारण धावपळ तेवढीच असते. हा चित्रपट आम्ही ५५ दिवसात पूर्ण केला.
खरोखरच साधा माणूस शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्यासमोर पोट तिडकीने मांडताना भाऊसाहेब शिंदेंकडे बघितल्यावर वाटत होते.

+1
5.7k
+1
3.6k
+1
2.3k
+1
0
IPRoyal Pawns