वितरक समीर दीक्षित यांची भाजपा चित्रपट युनियनच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ति…
दिनांक १४ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षाच्या दादर कार्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये भाजपा चित्रपट युनियनचे अध्यक्ष श्री. संदीप घुगे यांच्या उपस्थितीत श्री. समीर दीक्षित यांनी भाजपा चित्रपट युनियनमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी श्री. समीर दीक्षित यांची भाजपा चित्रपट युनियनच्या प्रदेश सचिव पदी (वितरण) नियुक्ती करण्यात आली. समीर दीक्षित यांनी आपल्या पिकल एंटरटेनमेंट अंतर्गत आतापर्यंत २५० हून अधिक चित्रपटांचे वितरण केले असून त्यांची पिकल म्युझिक कंपनीही कार्यरत आहे. समीर दीक्षित यांच्यासह ऋषिकेश भिरंगी, सुनील सामंत, शौकत पठान, शिल्पा राठी, कविता कपूर, राजू कांबळे, चंद्रेश शर्मा, कुंजबिहारी अग्रवाल, राकेश हांडे, प्रकाश भाटिया यांनी देखील भाजपा चित्रपट युनियनमध्ये प्रवेश केला.
श्री. समीर दीक्षित यांनी पुढील मार्गदर्शनाकरिता मा. सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि आशिषजी शेलार यांची भेट घेतली. यावेळी चित्रपटक्षेत्रातील वितरक, निर्माते आणि इतर संबंधित मंडळी उपस्थित होती. मराठी चित्रपट वितरणासंबंधी समस्यांच्या निराकरणाकरिता एक सभा बोलावण्याचे आश्वासन यावेळी मंत्री महोदयांनी दिले.