दिल को छुके, दिमाग मे घुस के, बत्ती गुल….
निर्माते मनमोहन देसाई यांच्या १९७० आणि १९८० च्या दशकातील मुख्य प्रवाहातील सिनेमातील कलाकार त्यांची फॅशन, त्यांचे कपडे, त्यांची हेअर स्टाईल, चित्रपटाचे कथानक, पात्रे, मांडणी अश्या विविध गोष्टीचे विडंबन एक मर्यादा राखून लेखक-दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते यांनी मराठीतील ‘दिल दिमाग और बत्ती’ हा चित्रपट आणला आहे.
चित्रपट किती सुपर आहे का सुमार आहे या भानगडीत न पडता आज अशाप्रकारे एक वेगळ्याच घाटणीचा चित्रपट आणायचा या ऋषिकेश गुप्ते यांच्या कल्पनेला खरोखरच सलाम केला पाहिजे.
खरं तर, या चित्रपटात दिलीप प्रभावळकर मनमोहन देसाई नावाच्या माणसाची भूमिका करताना दिसत आहेत. त्यांची मुलगी जया (सोनाली कुलकर्णी) हिचे लग्न अमिताभ (पुष्कर श्रोत्री) सोबत झाले आहे. जया तिघांना जन्म देते — दोन मुले आणि एक मुलगी (ज्यांची मोठी आवृत्ती सागर संत, मयुरेश पेम आणि संस्कृती बालगुडे यांनी केली आहे).
डोक्याला मार लागल्याने अमिताभ बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अमिताभ स्मरणशक्ती गमावून बसतो आणि परिस्थिती त्याला बिहारला घेऊन जाते जिथे त्याला एक नवीन नाव मिळाले – धर्मेंद्र उर्फ धरम. दरम्यान, जयाची तीन मुलं मोठी होऊन कलाकार बनतात. फिल्मी दुनियेत मोठं करण्यासाठी ते एका ब्रेकची वाट पाहत आहेत. पुढचा झांगडगुत्ता मोठ्या पडद्यावर पाहण्यात मजा आहे.
गुप्ते यांच्या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील काही मोठी नावे महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. कथा आणि अभिनयाच्या बाबतीत चित्रपट आव्हानांवर मात करतो.
एक आनंददायक कथा उलगडत असताना त्याचे सादरीकरण तुम्हाला सुरवातीला बुचकळ्यात टाकेल मात्र तुम्ही जसजसे पुढे जाल तसतसे या चित्रपटाचा आनंद घ्याल.
चित्रपटात ट्विस्ट आणि टर्नचे सतत डोस आहेत; भरपूर सबप्लॉट्स आणि कॅरेक्टर्सवर पकड ठेवल्याबद्दल लेखनाचंही कौतुक करायला हवं.
तीन भिन्न पात्रे साकारताना सोनाली कुलकर्णी एक उच्च दर्जाचा अभिनय सादर करते, दिलीप प्रभावळकर नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट आहेत, एकापेक्षा एक पात्र नेमकेपणाने साकारले आहेत.
पुष्कर श्रोत्री ने विनोदी अभिनय उत्तम केला आहे. वंदना गुप्ते, पुष्कराज चिरपुटकर आणि किशोर कदम एक डाकू, एक सरदार आणि बाबाजीच्या असामान्य भूमिकेत आकर्षक आहेत. वैभव मांगले, आनंद इंगळे, सागर संत, मयुरेश पेम आणि संस्कृती बालगुडे सारखे इतर सहाय्यक कलाकार यांची त्यांना चांगली साथ मिळाली आहे.
फीचर फिल्म स्पेसमध्ये ‘दिल दिमाग और बत्ती’ सारखे प्रयोग आपणास फारच दुर्मिळ पहावयास मिळतात मात्र लेखक दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते यांनी ती जोखीम पत्करली त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन