“सुर संगम_एक आवाज शहीदों के नाम,” ऑनलाईन व्हिडिओ गीत गायन स्पर्धेचा निकाल जाहीर….

सुमनालय फाऊंडेशन आणि आरसी –
रोटारॅक्ट क्लब ऑफ डी वाय पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मॅनेजमेंट (नवी मुंबई) (डीवायपीयूएसएम) च्या वतीने आपला ७४ वा स्वातंत्र्यदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सुर संगम_एक आवाज शहीदों के नाम, “ऑनलाईन व्हिडिओ गीत गायन स्पर्धा” आयोजित केली गेली, ज्याच्या माध्यमातून देशासाठी प्रेमभावना व्यक्त करण्यात आल्या. हा अविस्मरणीय अनुभव होता. ऑनलाइन सादरीकरण अतिशय सुंदर होते, ज्यात ६ वर्षाच्या मुलापासून ते अगदी ६४ वर्षाचे सुद्धा सहभागी झाले होते. सुमनलाय फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुजाता वॉरियर यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या देशाबद्दल असलेले प्रेम वाढवण्यासाठी आपल्या तरुणांना एकत्र केले पाहिजे. हे त्यांना वंचित गट आणि इतरांच्या कल्याणासाठी चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करेल.
मिठीबाई महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ.खेवना देसाई, आमच्या ट्रस्टच्या सचिव आणि महाराष्ट्र एनयूजे च्या अध्यक्षा शीतल करदेकर, डॉ. सुजाता वॉरियर हे तीन परीक्षक होते. स्पर्धा अतिशय कठीण होती आणि बक्षीस विजेत्यांचा निर्णय घेणे अवघड होते. प्रत्येक स्पर्धकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. तीन वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली.
६-१८ वयोगटात शैलेश कुमार यांना प्रथम पारितोषिक , सत्यजित विजयन यांना व्दितीय पारितोषिक तर रुही मैंदगीकर आणि साची मैंदगीकर यांना विशेष पारितोषीक घोषित करण्यात आले. विषेश बाब म्हणजे रूही व साची या ६ वर्षांच्या मुलींनी राष्ट्रावर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी स्पर्धेत भाग घेतला.
१९-४५ वयोगटात राहुल आर.के यांना प्रथम पारितोषिक, सीमा सादगर यांना व्दितीय पारितोषीक आणि लफ्ज़ बँड या नवी मुंबईतील व्यावसायिक बॅन्डला त्यांच्या देशभक्तीपर गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट व्हिडिओ सादरीकरणासाठी विशेष पारितोषिकाचे मानकरी ठरले.
हे लक्षात घेण्याजोगे आहे की ४५ वर्षीय किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील लोकांनी देखील “मेरे देश की धरती” सारखी लोकप्रिय गाणी गाऊन देशप्रेम वृद्धिंगत करण्यासाठी सहभाग घेतला. ४५-६० वयोगटात संजय माळवी, जे इंदूरच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आहेत यांना प्रथम पारितोषिक, कॅलिफोर्नियाचे व्यावसायिक ईश्वर अय्यर यांनी व्दितीय पारितोषिक आणि कर्नल सुनील शर्मा यांना विशेष पारितोषिक जाहीर करण्यात आले.
माजी सैन्य अधिकारी कर्नल सुनील शर्मा, यांनी आपल्या राष्ट्राच्या विकासात भारतीय सैन्याची नेहमीच महत्त्वाची भूमिका आहे हे आपल्या व्यस्त कामातूनही या स्पर्धेत सहभागी होऊन अधोरेखित केले.
नायर नेत्र चिकित्सालयातील , पेशाने एक नेत्रतज्ज्ञ डॉक्टर संतोष नायर यांनीसुद्धा आपल्या कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी झाले. प्रकाश हेरेकर, श्रीमती लता वॉरियर आणि सौ. संयोगिता* यांच्यासारखे ज्येष्ठ, जे व्यावसायिक गायक नाहीत, यांचा सक्रिय सहभाग महत्वाचा होता.
हे स्पष्टपणे सूचित होते की महामारी, सामाजिक अंतराच्या वेळीसुद्धा भारतीय नागरिक नैतिक मूल्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध अशासकीय संस्थांना पाठिंबा दर्शविण्यास इच्छुक आहेत. तसेच, डॉ. वॉरियरनी विश्वास व्यक्त केला की, साथीचे रोग आणि “कोरोना च्या भीती” च्या वेळी ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांनी स्वतःला व्यस्त ठेवून निरोगी राहण्यास प्रेरित केले पाहिजे. आपल्या आरोग्यासाठी सध्याच्या परिस्थितीत मानसिक आरोग्य मजबूत असणे फार महत्वाचे आहे. *रोट्रारियन अध्यक्ष हर्षिता राय, रोट्रारियन सचिव आर्यन राज, रोट्रारियन सिमांतीनी शेकदार, रोट्रारियन हृतिक बोकडे, रुद्रान, तुषार करदेकर, विवेक, विनय, अब्दुल, अक्षदा, निमिषा देसाई, मेघा आणि पार्वती* यांच्यासारख्या आयोजन समितीच्या उत्तम आयोजनामुळे ही स्पर्धा उत्तमप्रकारे संपन्न झाली.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns