६ जून २०२०, शनिवार – बातम्या
– यूपीएससीच्या स्पर्धापरीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर, नव्या वेळापत्रकानुसार सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी तर मुख्य परीक्षा 8 जानेवारी २०२१ रोजी होणार .
– सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस उपस्थिती अनिवार्य, राज्य सरकारचा निर्णय, हजर न राहिल्यास आठवडाभर गैरहजेरी लागणार.
– निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटींची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, अलिबागमध्ये नुकसानाची पाहणी.
– राज्यात कालपासून पुनश्च हरिओम, मुंबई, ठाण्यासह पुणे, नाशिकमध्ये व्यवहार सुरु, तर नागपूरमध्ये सम-विषम तारखेला दिशांनुसार दुकानं उघडणार .
– ‘छेडछाडीच्या कारणावरुन महिला कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची रुग्णालयातील कर्मचाऱ्यासोबत मारहाण, बीडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक घटना.
– देशभरात कोरोनाचा कहर, गेल्या २४ तासात जवळपास दहा हजार नवे रुग्ण, तर २७३ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर जगभरात एका दिवसात सव्वा लाख रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६७ लाखांजवळ.
– मुंबईमध्ये ९७ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात, सात दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज.
– गर्भवती हत्तीण हत्या प्रकरणी एका आरोपीला अटक, केरळ वन विभागाची कारवाई; स्फोटकांनी भरलेलं फळ खायला दिल्याने हत्तीणीचा मृत्यू.
– संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन सांगलीत प्रशासनाची तयारी, कृष्णा नदीने २० फुटाची पातळी ओलांडताच पूर पट्ट्यातील नागरिकांना सक्तीने स्थलांतरीत करणार .
– सिंधुदुर्गाच्या गवदेवमध्ये पुरुषांची वटपौर्णिमा, पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा, तर भावी पत्नीसाठी अविवाहितांच्या वडाला फेऱ्या .