सामाजिक संदेश आणि मनोरंजनाचा सुंदर मिलाफ ” कुर्ला टू वेंगुर्ला “

सामाजिक संदेश आणि मनोरंजनाचा सुंदर मिलाफ ” कुर्ला टू वेंगुर्ला “

सचिन चिटणीस, या चित्रपटाला मिळत आहेत

आजकाल गावातील मुलींना खास करून कोकणातील मुलींना आपल्या गावातील मुलगा हा आपला जोडीदार बनवावा असं वाटत नाही. त्यांना मुंबईचे एवढे आकर्षण किंवा भुरळ म्हणा पडले आहे की मुंबईत गेलं तरच आपले पुढील आयुष्य सुखाचे होईल, गावात काय ठेवले आहे हा विचार त्या करताना दिसत आहेत.

 गावात चौसोपी वाडा असला तरी त्या मुलांपेक्षा मुंबईत एका खोलीचं घर तेही भाड्याने असेल तरी चालेल पण मुंबईचाच नवरा करायचा हा त्यांच्या मनात घट्ट विचार रुजला गेला आहे.

 ही एक गंभीर समस्या असून दिग्दर्शक विजय कलमकर यांनी या गंभीर विषयाला विनोदी आणि भावनिक अंगाने हात घातला आहे आणि तो अतिशय यशस्वी झाला आहे.

चित्रपटात कलाकारांच्या तोंडून निघालेली कोकणी भाषा अतिशय गोड वाटते.

चित्रपटात प्रमुख भूमिका प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले, स्वानंदी टिकेकर यांच्या आहेत. दिग्दर्शन विजय कलमकर यांचे असून कथा-पटकथा अमरजित आमले यांनी लिहिली आहे.

छायांकनात आणि संगीत क्षेत्रातही हा चित्रपट उठावदार ठरतो, पार्श्वसंगीत आणि गीतलेखनाद्वारे स्थानिकतेची झलक मिळते.

एकूणच, चित्रपटाची वास्तवदर्शी कथा, अभिनय आणि सांस्कृतिक सादरीकरण हे त्याचे बलस्थान आहेत.

प्रल्हाद कुडतरकरने गावातील युवकाच्या भूमिकेत जान आणली आहे.

वीणा जामकरने अत्यंत दमदार आणि प्रगल्भ भूमिका  साकारली आहे.

वैभव मांगलेने आपली भूमिका चोख निभावली आहे.

स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत, सुनील तावडे यांची साथ उत्तम मिळाली आहे.

कसलेली स्टारकास्ट, प्रामाणिकपणे निभावलेली भूमिका हे चित्रपटाचे बलस्थान आहे.

 

दिग्दर्शन – विजय कलमकर

कथा, पटकथा, संवाद – अमरजित आमले

छायाचित्रण – रंगनाथ बाबू गोगीनेनी

संकलन – विजय कलमकर

गीतकार – चंचल काळे, अमरजीत आमले

संगीतकार, पार्श्वसंगीत  – अक्षय खोत

*कलाकार*

प्रल्हाद कुडतरकर – आनंद सारंग

वीणा जामकर – गौरी सारंग

वैभव मांगले –  बाजीराव तांबट

सुनील तावडे – चंद्रकांत सारंग

स्वानंदी टिकेकर – अस्मिता धोपेश्वरकर

साईंकित कामत – परिमल जोशी

कविता अमरजीत  – शारदा तांबट

अमेय परब – नंदु तांबट

शेखर बेटकर – बाबू

अनघा राणे – शर्मिला सारंग

IPRoyal Pawns