अभिनयात उंचावलेला मात्र फटकथेत फसलेला ‘दशावतार’
सचिन चिटणीस, या चित्रपटाला मिळत आहेत

चित्रपटाची कथा कोकणातील दशावतारी नाटकाच्या पार्श्वभूमीवर घडते. प्रमुख पात्र बाबुली मेस्त्री (दिलीप प्रभावळकर) हे वयोवृद्ध ‘दशावतारी’ या नाटकात काम करणारे अतिशय सुप्रसिद्ध असलेले नायक आहेत. ज्यांना आपल्या कले विषयी प्रचंड आपुलकी आहे. त्यांचा मुलगा माधवला मात्र आपल्या वडिलांनी या वयात विश्रांती घ्यावी असे वाटत असते. बाबुली मात्र माधवला नोकरी मिळेपर्यंत रंगभूमी सोडणार नाहीत असे निक्षुन सांगतात.
महाशिवरात्रीच्या रात्री बाबुली यांनी शेवटचा दशावतार सादर करत असताना गावात एक अनपेक्षित दु:खद घटना घडते आणि गावात दहशतीचे वातावरण निर्माण होते. ही घटना दशावतार नाटक, कोकणी लोककथा, राखणदार संस्कृति, आणि गूढता यांच्या गुंत्यांसहित साकारली जाते. पुढील कथानकात रहस्य, संशय आणि कोकणातील प्राचीन लोकमान्यता यांचा थरार निर्माण होतो. दुर्घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीती पसरते, आणि सत्याचा शोध लागतो. दशावतारी परंपरेशी निगडित काही गूढ प्रथा आणि कोकणातील “राखणदार” संस्कृतीची एक अनोखी गुंतागुंत समोर येते. कथानक गूढरम्य जंगल, कुटुंब आणि समाज यांच्या द्वंद्वभोवती फिरायला लागते आणि यात चित्रपट भरकटतो.
शोधाच्या प्रक्रियेत, बाबुली आणि त्यांच्या कुटुंबासोबत गावातील घटक पात्रांच्या संबंधातील गुपित उलगडते. सत्य बाहेर येते, खोट्या गोष्टी आणि चुकीच्या समजुतींना छेद मिळतो, आणि गावाची एकता किंवा विघटन याचा निर्णायक क्षण घडतो.
दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय अत्यंत कसदार असून, त्यांच्या सादरीकरणात दशावतारी शैलीला न्याय मिळाला आहे. इतर कलाकार महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदुलकर, भरत जाधव यांचाही अभिनय चांगला आहे.
संगीतकार ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांचं संगीत कथा आणि वातावरण सशक्त करते. गाणी कथेला पूरक आहेत आणि पार्श्वसंगीतामुळे नाट्याला वेगळा थरार लाभतो. कोकणी संस्कृती, लोककला, आणि निसर्ग यांचे प्रभावी चित्रण, दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेतील ताकद आणि इतर कलाकारांचे सहज अभिनय. पारंपारिक दशावतारी नाटकांची रंगत आणि संगीत मोठ्या खुबीने मांडले आहे.
मात्र एवढं सगळं असूनही कथानक काही ठिकाणी रेंगाळतं, मध्यंतरापर्यंत गती कमी जाणवते,
शेवटाकडे पटकथा थोडी विस्कळीत वाटते; खूप काही दाखवण्याच्या प्रयत्नात गोष्टी गोंधळतात यामुळेच चांगला झालेल्या चित्रपट फसला जातो.
* वयोवृद्ध अशक्त रातांधळी व्यक्ती रात्री भयाण जंगलात पुरावे शोधण्यासाठी एकटी फिरते तसेच त्याच वेळेस बलदंड असं खलनायकांशी लढा देते हे खूपच अति वाटते.
* काही ठिकाणी अनावश्यक फुटेज वाटते ते एडिट व्हावयास हवे होते.
* चित्रपट पटकथेमध्ये फसला गेलेला आहे.
* चित्रपट कित्येक ठिकाणी अतिशय संथ झालेला आहे.































