लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना

दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा स्मृतिदिन २४ एप्रिल रोजी प्रतिवर्ष साजरा करण्यात येतो. मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा या दिवशी सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आत्तापर्यंत सुमारे २१२ व्यक्तींना गेल्या ३४ वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत. तसेच

या दिवशी पुरस्कार सोहळ्यानंतर संगीत तथा नाट्य, नृत्य असे कलाक्षेत्रातील विविध कार्यक्रम केले जातात. तसेच २०२२ वर्षापासून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ एक विशेष म्हणजे “लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार” प्रदान करण्याचे सर्व विश्वस्तांनी ठरविले आहे.

त्यानुसार २४ एप्रिल २०२२ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला होता व २४ एप्रिल २०२३ रोजी आशा भोसले यांना हा पुरस्कार दिला होता.

हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच अशा व्यक्तीला दिला जातो की ज्याने आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान दिले आहे.

यंदाचा हा कार्यक्रम दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पु.), मुंबई येथे बुधवार २४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वा. असेल. यंदाचे ८२ व्या पुण्यतिथी निमित्त दिले जाणारे पुरस्कार खालीलप्रमाणे

१) लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – पद्मविभूषण अमिताभ बच्चन

२) मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – ए.आर. रहमान (प्रदीर्घ संगीत सेवा)

३) मोहन वाघ पुरस्कार – गालिब नाटक (उत्कृष्ट नाट्यनिर्मिती २०२३-२४)

४) आनंदमयी पुरस्कार (आशा भोसले पुरस्कृत) – दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल (समाज सेवा)

 ५) वाग्विलासीनी पुरस्कार व्यक्ती/संस्था – मंजिरी फडके (प्रदीर्घ साहित्य सेवा)

६) मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : अशोक सराफ (प्रदीर्घ नाट्य-चित्रपट सेवा)

७) मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : पद्मिनी कोल्हापुरे (प्रदीर्घ चित्रपट सेवा)

८) मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : रूपकुमार राठोड (प्रदीर्घ संगीत सेवा)

९) मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : भाऊ तोरसेकर (प्रदीर्घ पत्रकारिता)

१०) मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : अतुल परचुरे (प्रदीर्घ नाट्य सेवा)

११) मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : रणदीप हुडा (उत्कृष्ठ चित्रपट निर्मिती) (विशेष पुरस्कार)

वरील सर्व पुरस्कार आशा भोसले यांच्या हस्ते प्रदान केले जातील.

हृदयनाथ मंगेशकर म्हणतात “मास्टर दीनानाथजींचे गायक, संगीतकार आणि रंगमंच कलाकार म्हणून अतुलनीय योगदान असून महाराष्ट्र आणि भारतातील लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मरणार्थ मंगेशकर परिवार दिग्गजांना सन्मानित करण्यासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान पुरस्कारांचे आयोजन करते. या पुरस्कारांसाठी आम्हाला जनतेचे प्रेम आणि पाठिंबा मिळाल्याचा आनंद आहे.”

पुरस्कार सोहळा संध्याकाळी ६.१५ ते ६.३० दरम्यान सुरू होईल. मध्यांतर ८.१५ ते ८.३० पर्यंत असेल. त्यानंतर संगीतमय कार्यक्रम होईल.

“।। श्रीशारदा विश्वमोहिनी लतादीदी ।।” हा संगीतमय कार्यक्रम भारतरत्न लता मंगेशकर यांना सांगितीक मानवंदना म्हणून भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर सादर करतील. कलाकार गायिका ‘दीदी’ पारितोषिक विजेती विभावरी आपटे-जोशी (एकल संगीत मैफल)

वाद्यवृंद सहकलाकार  विवेक परांजपे, केदार परांजपे, विशाल गंडूतवार,

डॉ.राजेंद्र दुरकर, प्रसाद गोंदकर व अजय अत्रे सादर करतील.

हा संगीत कार्यक्रम हृदयेश आर्टस्तर्फे आयोजित करण्यात आला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने ८२ व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns