नियामक मंडळाच्या बहुमताच्या निर्णयाविरुद्ध कोणतीही भूमिका मांडू नये, तसा आपल्याला कोणताही अधिकार नाही. – नियामक मंडळ सदस्य

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कारभारावर होत असलेल्या कथित आरोप प्रत्यारोपा संबंधी प्रवक्ते मंगेश कदम यांनी मंगळवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचा व्हाट्सएप मेसेज नाट्यपरिषदेच्या पत्रकार ग्रुप वर टाकला मात्र त्यास नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत त्यास विरोध दर्शवत “आपण कोणत्या अधिकारात ही पत्रकार परिषद घेत आहात. परिषदेच्या अनागोंदी कारभाराबाबत दि. १३ जानेवारी २०२१ च्या सभेत सर्व हिशेब आणि विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभेने बहुमताने नामंजूर केले आहेत हे आपणास माहीत आहे. नियामक मंडळाच्या बहुमताच्या निर्णयाविरुद्ध कोणतीही भूमिका आपण मांडू नये. तसा आपल्याला कोणताही अधिकार नाही.

सभेत झालेल्या निर्णया व्यतिरिक्त नियामक मंडळाच्या मंजुरीविना कोणतेही उलट सुलट माहिती देण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. हे घटनाविरोधी आणि नियामक मंडळाच्या विरोधी कामकाज होईल.

वृत्तपत्रात आलेल्या आणि येणाऱ्या बातम्यांबाबत नियामक मंडळ चर्चा करून निर्णय घेईल. सभेत झालेल्या निर्णया व्यतिरिक्त आपण यावर कोणतेही भाष्य अथवा माहिती देऊ नये असे आम्ही आपल्याला पूर्वसूचित करत आहोत. याची नोंद घ्यावी”
अश्या आशयाचे पत्र तातडीने प्रवक्ते मंगेश कदम यांना पाठवले असून तरीही जबरदस्तीने पत्रकार परिषद घेण्यात आल्यास आम्ही त्याठिकाणी येऊन तीव्र निषेध नोंदवू असे ‘मुंबई न्यूज’ शी बोलताना सतीश लोटके यांनी सांगितले.
त्याच प्रमाणे योगेश सोमण यांनी सुद्धा मंगेश कदम (प्रवक्ता, नाट्य परिषद) व प्रसाद कांबळी (अध्यक्ष, नाट्य परिषद) यांनी पत्र लिहून “आपण दिनांक १६ फेब्रुवारी रोजी नाट्य परिषदेवर होत असलेल्या उलट सुलट आरोपांवर उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावल्याचे समजले आहे आणि आश्चर्य वाटले कारण ३६ नियामक मंडळाच्या सदस्यांच्या सह्या असलेले एक आवेदन पत्र आपल्याकडे येऊन पडलेले असताना त्याला दोन ओळींचे उत्तर देण्यासाठी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना वेळ नाही आणि बैठकीत अधिकृतरित्या चर्चिले गेलेले आरोप वा आक्षेप याला परिषदेच्या बैठकीत उत्तर देण्याऐवजी आपली आपली पत्रकार परिषद घेऊन त्यात हे विषय मांडणं अयोग्य आहे असं मला वाटतं, शक्य झाल्यास परिषदेच्या नियामक मंडळासमोर आपण आणि अध्यक्ष यांनी उत्तर देण्यासाठी वेळ दिल्यास ते जास्त योग्य ठरेल.
आपण मलाही या पत्रकार परिषदेला निमंत्रित केले आहे, मी नियामक मंडळ बैठकीत जे प्रश्न विचारले होते ते च याही पत्रकार परिषदेत विचारीन आशा आहे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी मला उत्तर देतील.” असे पत्र पाठवले आहे त्यामुळे आता मंगळवार १६ फेब्रुवारी रोजी नक्की काय होते याकडे सर्व नाट्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns