निसर्गातील संगीत जणू शांत झाले, पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन.

निसर्गातील संगीत जणू शांत झाले, पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन.

आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे ज्‍येष्‍ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा ( ८४ ) यांचे आज सकाळी हृद्‍यविकाराच्‍या धक्‍क्‍याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्‍नी मनोरमा आणि मुलगा राहुल शर्मा असा परिवार आहे.

पंडित शिवकुमार शर्मा यांनी काश्‍मीरमधील लोकवाद्‍य संतूरला आंतरराष्‍ट्रीय पातळीवर मान्‍यता मिळवून दिली.

पंडित शिवकुमार शर्मा व बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ‘शिव-हरी’ या नावाने अनेक चित्रपटांना संगीत दिले. यात सिलसिला, फासले, चांदणी, लम्‍हे आणि डर चित्रपट प्रामुख्याने आहेत.
तर चांदनी चित्रपटातील ‘मेरे हाथों में नौ-नौ चूडियां है’ हे त्‍यांनी संगीतबद्‍ध केलेले व अभिनेत्री श्रीदेवीवर चित्रीत करण्‍यात आलेले गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं.

संगीत क्षेत्रात दिलेल्‍या अमूल्‍य योगदानाबद्‍दल पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले होते. “आज निसर्गातील संगीत शांत झालं.” – दुर्गा जसराज.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns