रणबीर कपूर अभिनय सोडणार? ‘रामायण’च्या यशानंतर अभिनेत्याच्या विधानाने चाहत्यांना धक्का; दिग्दर्शनात पदार्पणाचे संकेत!

रणबीर कपूर अभिनय सोडणार? ‘रामायण’च्या यशानंतर अभिनेत्याच्या विधानाने चाहत्यांना धक्का; दिग्दर्शनात पदार्पणाचे संकेत!

बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ या महाकाय चित्रपटामुळे तुफान चर्चेत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले असतानाच, रणबीरच्या एका विधानाने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली आहे. अभिनय क्षेत्राला लवकरच अलविदा करण्याचे संकेत त्याने दिल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

​“अभिनेता म्हणून हे माझे शेवटचे दशक…”

रणबीर कपूरने नुकतीच ‘बीबीसी एशियन नेटवर्क’च्या एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमावर बोलताना तो म्हणाला, “कोणताही मोठा ब्रेक न घेता मी सलग एकामागून एक चित्रपटांमध्ये काम करत आहे.” याच संवादादरम्यान त्याने एक धक्कादायक वक्तव्य केले. तो म्हणाला, “मला वाटते की एक अभिनेता म्हणून हे माझे शेवटचे दशक आहे.” रणबीरचे हे बोलणे ऐकून मुलाखतीला उपस्थित असलेली त्याची ‘रामायण’मधील सहकलाकार साई पल्लवीसुद्धा क्षणभर थक्क झाली.

​विधानामागील नेमका अर्थ काय?

आपल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आल्याचे लक्षात येताच रणबीरने या विधानाचा नेमका अर्थ स्पष्ट केला. सध्याच्या कारकीर्दीतील संधींबद्दल बोलताना तो म्हणाला, “माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की, मला अशा प्रकारच्या उत्तमोत्तम भूमिका पुन्हा कुठे साकारायला मिळणार आहेत?” ‘रामायण’सारख्या भव्य, महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची संधी वारंवार मिळत नाही, याच संदर्भाने आपण हे बोलल्याचे त्याने स्पष्ट केले.

​अभिनयानंतर आता दिग्दर्शनात एन्ट्री!

रणबीर कपूर केवळ अभिनयावरच थांबणार नसून, लवकरच तो चित्रपट दिग्दर्शनात पाऊल ठेवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिग्दर्शक बनण्याची आपली जुनी इच्छा असल्याचे सांगत त्याने यासाठी प्रत्यक्ष काम सुरू केल्याचेही उघड केले. रणबीरने त्याच्या पहिल्या चित्रपटाची पटकथा (स्क्रिप्ट) लिहिण्यास सुरुवात केली असून, येत्या दोन ते तीन वर्षांत दिग्दर्शक म्हणून आपला पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा त्याचा मानस आहे.

IPRoyal Pawns