अंधेरी अभिमान गौरव संध्या २०२२

अंधेरी अभिमान गौरव संध्या २०२२

अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार रमेश लटके यांनी शुक्रवार दिनांक ६ मे २०२२ रोजी करोना संक्रमण काळातील कामगिरी तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार्यात कार्यरत असणाऱ्या संस्था, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला व क्रीडा क्षेत्रातील १२ मान्यवरांचा अंधेरी अभिमान स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. त्यामध्ये रायफल शूटिंग मध्ये अंधेरीचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेणारी कुमारी तन्वी सावंत व बॉक्स कब्बडी खेळातील आंतरराष्ट्रीय प्रथम पुरस्कार प्राप्त कुमार अनिकेत लोंढे, करोना काळात आशिया खंडामध्ये नामांकित झालेले सेव्हन हिल रुग्णालय, पवई मधील रोपट्याचे वटवृक्ष करणारे मिलिंद विद्यालय चे संस्थापक श्री सदानंद रावराणे, पोलिसांच्या अद्वितीय कामगिरी बद्दल परिमंडळ १० चे उपायुक्त डॉ महेश्वरी रेड्डी, वैद्यकीय विशेष सेवा साठी डॉ रत्नपारखी व डॉ प्रेम अगरवाल, अंधेरीकर उद्योजक दाम्पत्य महेश आणि जयश्री पारकर यांना करोना काळात परगावी जाणाऱ्या मजुरांच्या विशेष सेवा सहकार्यासाठी तसेच कला क्षेत्रातील अंधेरीकर अभिनेते गणेश यादव, प्रथमेश परब विशेष म्हणजे आता अंधेरीकर झालेल्या वैशाली सामंत, हिंदू नववर्ष शोभा यात्रा २०२२ मधील उत्कृष्ट देखावा वाहन साठी शिवसेना शाखा ८० आणि ८१ यांना संयुक्तरित्या अंधेरी अभिमान स्मृतिचिह्न देउन गौरविण्यात आले.

मराठी चित्रपट, नाट्य व मालिकांमधील अनेक दिग्गज कलाकारांच्या कार्यक्रमाची आखणी कार्यक्रमाचे दिग्दर्शक सुशांत शेलार यांनी एका सुत्रबध्द पद्धतीने केली होती.

कार्यक्रमाची सुरवात शाहीर अमरशेख यांचे नातू निशांत शेख यांच्या पोवाड्याने झाली, गणपती नमन सादरीकरण राधा सागर आणि आशिष पाटील यांनी वेगळ्या ढंगात केले. लता दीदी यांना अनोखी गान श्रद्धांजली स्मिता शेवाळे आणि धनश्री काडगावकर यांच्या अदाकारी आणि नृत्याने सादर झाली. नवीन प्रकारे गोंधळ साजरा केला शर्मिष्ठा आणि शिव ठाकरे यांनी, अमृता घोंगडे आणि गिरीजा प्रभू यांनी लावणी सादरीकरण मध्ये धमाका केला. बॉलीवूड ऍक्ट मध्ये रीना मधुकर आणि अक्षय वाघमारे यांनी दिलखेचक नृत्य सादर केले. आनंदी जोशी हिच्या प्रत्यक्ष गायनाने अनेक मालिकांच्या शीर्षक गीतांचे सादरीकरण हि कार्यक्रमाची जमेची बाजू होती. हास्यजत्रा फेम गौरव मोरे आणि चेतना भट्ट यांनी विनोदाची भट्टी जमवली. कार्यक्रमामध्ये “धर्मवीर
मुक्काम पोस्ट ठाणे” टीझर ला वन्स मोर मिळाले, आणि मुख्य भूमिका करणाऱ्या प्रसाद ओक यांची सूत्रधार संदीप पाठक यांनी घेतलेली मुलाखत लाजवाब झाली. वैशाली सामंत यांनी स्मृतिचिन्ह स्वीकारताना सर्व बच्चे कंपनीबरोबर “ऐका दाजीबा” सादरीकरण कार्यक्रमाचे केंद्रबिंदू होते.

कार्यक्रमास नगरविकास व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns