कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे
मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणाऱ्या वीरांना नम्र अभिवादन
शेतकरी कामगारांचे स्मरण त्यांना मानाचा मुजरा
गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रावर दुष्टचक्र मात्र हे दिवस सुद्धा जातील
महाराष्ट्राची जनता संयम पाळतेच, यापेक्षा कडत निर्बंध घालण्याची वेळ येणार नाही
अजुनी काही दिवस बंधन पाळावे लागतील
लॉकडाऊन नसता तर साडेनऊ ते दहा लाख ॲक्टिव रुग्ण महाराष्ट्रात असते
गेल्या काही दिवसात कोरोना वाढ स्थिरावली आहे लॉकडाऊन मुळे रोजी मंदावेल पण रोटी थांबू देणार नाही
राज्याचं हिच साधलं जात असेल तर इतरांचे अनुकरण करू
गेल्यावर्षी राज्यात २ प्रयोगशाळा होत्या आज ६०९ प्रयोगशाळा आहेत तर साडेपाच हजार कोविड सेंटर्स आहेत
रुग्ण वाढ अधिक झाली तर मोठी अडचण होऊ शकते राज्याला दररोज ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे
तिसरी लाट आली तर ऑक्सिजन कमी पडू देणार नाही हॉस्पिटलमध्येच ऑक्सीजन प्लांटची व्यवस्था करणार काही ठिकाणी ऑक्सीजन प्लांटचे काम सुरू झाले आहे.
काही दिवसात २७५ ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित होतील
गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणेने एका क्षणाचीही उसंत घेतली नाही
जम्बो कोविड सेंटर्सचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत
तिसरी लाट येणार असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे मात्र या लाटेला तोंड देण्यासाठी सरकारची तयारी आहे
१८ ते ४४ वयोगटातले महाराष्ट्रात सहा कोटी नागरिक असून प्रत्येकी दोन डोस याप्रमाणे बारा कोटी डोस द्यावे लागणार आहेत, १२ कोटी डोसची रक्कम एकरकमी चेकने देण्याची सरकारची या क्षणी देखील तयारी आहे, उद्यापासून राज्यात १८ ते ४४ या वयोगटातल्या नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे.
प्रत्येक राज्यासाठी लसीकरणाचा वेगळा ॲप तयार करण्याची केंद्राला विनंती केली आहे
जून जुलैपर्यंत लसीचा पुरवठा सुरळीत होईल
येत्या महिन्यात लग्नाचे मुहूर्त खूप आहेत पण संयम पाळला पाहिजे
रोज दहा लाख नागरिकांना लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे.