प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे बांद्रा येथील नानावटी रुग्णालयात हृदयविकाराने निधन त्या 71 वर्षाच्या होत्या.
गुरुवारी मध्यरात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने तातडीने त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मालाड येथील कबरस्थान मध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांनी आज पर्यंत २००० पेक्षा जास्त गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. त्यांची कोरोना टेस्ट ही करण्यात आली होती मात्र ती निगेटिव्ह आली.
+1
+1
+1
+1