लेखक आणि दिग्दर्शक डी संदीप यांचा ‘काळ’

लेखक आणि दिग्दर्शक डी संदीप यांचा प्रेक्षकांसाठी खास तयार केलेला बहुप्रतीक्षित ‘काळ’ हा हॉरर चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होत आहे. मराठीमध्ये वेगळी वाट चोखाळणाऱ्या आणि आगळा ठरणाऱ्या ‘काळ’ या हॉरर चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर आज प्रकाशित झाले आहे .

मराठीमध्ये अनेक हॉरर चित्रपट तयार झाले आहेत, पण ‘काळ’च्या सादरीकरणाची पठडी वेगळी आहे आणि त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनच्या हेमंत रूपारेल आणि रंजीत ठाकूर, नितिन वैद्य (नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि डी संदीप (कांतिलाल प्रॉडक्शन्स), प्रवीण खरात आणि अनुज अडवाणी यांची आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणे दिग्दर्शक डी संदीप यांच्यासाठी एवढे सोपे नव्हते. पण त्यांनी ‘काळ’ या चित्रपटाचा दृढनिश्चय केला होता आणि आयुष्यातील अनुभवांच्या माध्यमातून चित्रपट पूर्ण करण्याचे त्यांनी ठरवले होते.

हॉरर चित्रपटाच्या आवड़ीबद्दल बोलताना ‘काळ’ चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डी संदीप म्हणाले, ‘हॉलीवुडमधील या प्रकारच्या म्हणजे हॉरर चित्रपटांनी मी माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये खूपच प्रभावित झालो होतो. त्यासाठी आवश्यक ते संशोधन केल्यानंतर आता प्रेक्षकांना भावेल असा ‘काळ’ घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट रसिकांचा या प्रकारच्या चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. शिवाय आणखीही हॉरर मराठी चित्रपटांची निर्मिती मराठीमध्ये होण्यासाठी निर्मात्यांना त्यामुळे प्रेरणा मिळेल.”

“काळाचं ग्रहण फार वाईट, एकदा लागलं की सहजा सहजी सुटत नाही, या वेगळ्या प्रकारच्या आणि तुम्हाला घाबरवून टाकेल असा या चित्रपटाच्या थरारक अनुभवासाठी २४ जानेवारी २०२० पासून तयार रहा, असेही दिग्दर्शक डी संदीप यांनी म्हटले आहे.”

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns