क्विक टीव्ही आणि मौज घेऊन येत आहेत ऑक्टोबरमध्ये मनोरंजनाची दमदार मेजवानी!

*स्त्रीच्या सन्मानापासून सूडाच्या थरारापर्यंत; क्विक टीव्ही आणि मौज घेऊन येत आहेत ऑक्टोबरमध्ये मनोरंजनाची दमदार मेजवानी!*

_‘किस्मत वाली बेटी’मध्ये जन्माआधीच मुलीच्या अस्तित्वासाठी आईचा संघर्ष; कौटुंबिक नाट्य, प्रेम, विश्वासघात, कल्पनारम्य कथा आणि थरारपटांचा रंगणार अनोखा संगम_

स्त्रियांचे हक्क, समानता, कौटुंबिक नात्यांमधील अपेक्षा आणि समाजातील रूढी यांवर आज अधिक मोकळेपणाने चर्चा होत असताना, शेअरचॅटच्या क्विक टीव्ही आणि मोज प्लस या लघुनाट्यकथांच्या व्यासपीठांनी ऑक्टोबर महिन्यासाठी मनोरंजनाची वैविध्यपूर्ण मेजवानी सादर केली आहे. कौटुंबिक नात्यांतील संघर्षापासून स्त्रीच्या आत्मसन्मानापर्यंत, प्रेम आणि विश्वासघातापासून कल्पनारम्य कथा, साहस आणि थरारापर्यंत विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा या नव्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकांमध्ये ‘किस्मत वाली बेटी’ ही कौटुंबिक नाट्यकथा विशेष लक्ष वेधून घेते. जन्माआधीच मुलगी असल्याचे समजल्यानंतर तिच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या आईची कहाणी या मालिकेतून मांडण्यात आली आहे.

‘किस्मत वाली बेटी’मध्ये मेहक या गर्भवती महिलेचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. गर्भातील बाळ मुलगी असल्याचे बेकायदेशीररीत्या समजल्यानंतर तिच्या कुटुंबीयांकडून गर्भपातासाठी दबाव आणला जातो. या परिस्थितीत मेहक आपल्या होणाऱ्या मुलीच्या अस्तित्वासाठी उभी राहते. केवळ कल्पनारम्य कथानकापुरती मर्यादित न राहता, मुलगा की मुलगी यावरून महिलांवर लादल्या जाणाऱ्या अपेक्षा, कुटुंब आणि समाजाच्या दबावाखाली घेतले जाणारे निर्णय तसेच आई-मुलीच्या नात्यातील भावनिक बंध यांचा वेध ही मालिका घेते. स्त्रीचे आयुष्य आणि तिचे निर्णय यांना समाजातील रूढींच्या चौकटीत मोजण्याच्या मानसिकतेवरही ही कथा प्रश्न उपस्थित करते.

स्त्रीचा आत्मसन्मान आणि स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा धागा क्विक टीव्ही आणि मोज प्लस यांच्या ऑक्टोबरमधील इतर कथांमध्येही पाहायला मिळणार आहे. ‘पत्नी विरुद्ध माँ’ या मालिकेत २५ वर्षे कुटुंबासाठी त्याग केल्यानंतर पतीकडूनच दुर्लक्षित होणाऱ्या गरिमाची कथा मांडण्यात आली आहे. घटस्फोटाची मागणी करणारा पती तिला सर्वांसमोर अपमानित करतो. त्यानंतर गरिमाचा प्रवास केवळ तुटलेल्या वैवाहिक नात्यातून बाहेर पडण्याचा राहत नाही, तर स्वतःचा सन्मान पुन्हा मिळवण्याचा आणि स्वतःतील सामर्थ्य ओळखण्याचाही ठरतो.

‘सौदा मोहब्बत का’ ही मालिका नात्यांमधील प्रेम, दुरावा आणि पश्चात्ताप यांची वेगळी बाजू दाखवते. रविनाला अनेक वर्षे पती मयंकला गृहीत धरल्यानंतर त्याच्या खऱ्या मूल्याची जाणीव होते. मात्र, तो तिच्याशिवाय नव्याने आयुष्य उभे करू लागल्यानंतर तिला आपल्या निर्णयांचे परिणाम समजू लागतात. दुसरीकडे, ‘संगदिल सनम’मध्ये त्रिशाच्या वैवाहिक आयुष्यातील बदलत्या समीकरणांचा वेध घेतला आहे. तिने कायमच कमी लेखलेल्या पतीचे वेगळे रूप समोर आल्यानंतर त्यांच्या नात्यात नवे संघर्ष निर्माण होतात. विश्वासघात, नात्यांमधील बदल आणि चुकीच्या निर्णयांचे परिणाम या कथांमधून उलगडणार आहेत.

*अभिनेत्री अलिशा पनवार म्हणते, “लघुनाट्यकथांमुळे भावनाप्रधान आणि वेगळ्या संकल्पनांवरील कथा प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळते.”*
‘सौदा मोहब्बत का’मध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री अलिशा पनवार हिने क्विक टीव्ही आणि मोज प्लस यांच्या वाढत्या आशयवैविध्याबद्दल आपले मत व्यक्त केले. ती म्हणाली, “लघुनाट्यकथांनी कथाकथनासाठी एक अतिशय वेगळे आणि रंजक व्यासपीठ निर्माण केले आहे. या माध्यमातून तीव्र भावना आणि वेगळ्या संकल्पनांवरील कथा थेट, प्रभावी आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या पद्धतीने मांडता येतात. क्विक टीव्हीबद्दल मला सर्वाधिक आवडणारी गोष्ट म्हणजे येथे विविध प्रकारच्या कथा सादर केल्या जात आहेत आणि हे माध्यम सातत्याने विस्तारत आहे. या ऑक्टोबरमध्ये माझ्या तीन वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, प्रत्येक मालिकेचे जग आणि व्यक्तिरेखांचे परस्परसंबंध पूर्णपणे वेगळे आहेत. नातेसंबंध आणि विश्वासघातापासून गुन्हेगारी, साहस आणि भविष्यातील विनाशानंतरच्या जगापर्यंत अनेक विषय या माध्यमातून हाताळता येत आहेत. प्रेक्षकांसोबतच कलाकारांसाठीही हा सकारात्मक बदल आहे. यामुळे पारंपरिक चौकटींपलीकडील कथा सांगण्याच्या आणि वेगवेगळ्या प्रकारांमध्ये प्रयोग करण्याच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.”

*‘महाबली रक्षक’मधील रोहित चौधरीला भावली शिवांशची व्यक्तिरेखा**
कल्पनारम्य कथांच्या विश्वात ‘महाबली रक्षक’, ‘पशु सम्राट’ आणि ‘जादूगर राजकुमार’ या मालिकाही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. लपलेली ओळख, असामान्य शक्ती आणि स्वतःची खरी क्षमता सिद्ध करणाऱ्या व्यक्तिरेखा या कथांच्या केंद्रस्थानी आहेत. ‘महाबली रक्षक’मधील अनुभवाबद्दल अभिनेता रोहित चौधरी म्हणाला, “शिवांशच्या व्यक्तिरेखेतील विरोधाभास मला सर्वाधिक भावला. इतरांच्या नजरेत तो एक सामान्य आणि असहाय व्यक्ती आहे; मात्र प्रत्यक्षात त्याच्याकडे एक विलक्षण ओळख आणि मोठी जबाबदारी आहे. सुरुवातीला कमी लेखल्या जाणाऱ्या व्यक्तिरेखेचे खरे सामर्थ्य हळूहळू उलगडताना पाहणे प्रेक्षकांना आवडते. लघुनाट्यकथांच्या माध्यमातून असे क्षण वेगाने उलगडता येतात आणि अनपेक्षित वळणांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता टिकून राहते. क्विक टीव्हीसारखी व्यासपीठे या माध्यमातून कल्पनारम्य आणि भव्य स्वरूपाच्या कथा सादर करत आहेत, हीदेखील आनंदाची बाब आहे.”

*जुगार, प्रेम, सूड आणि गुन्हेगारीचा थरारही अनुभवता येणार*
ऑक्टोबरमधील या मनोरंजनाच्या मेजवानीत ‘जुवारी नं. १’ आणि ‘गॅम्बलिंग का बाजीगर’ या मालिकांमधून जुगाराच्या जगातील मोठ्या पैजा आणि त्यांचे परिणाम पाहायला मिळतील. ‘प्यार का काउंटडाउन’मध्ये अलौकिक शक्ती, प्रेम आणि सूड यांचा संगम अनुभवता येईल, तर ‘गँग्स ऑफ गुरुग्राम’ ही गुन्हेगारी आणि सूडावर आधारित थरारकथा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

एकीकडे स्त्रियांचे स्वातंत्र्य, आत्मसन्मान, कौटुंबिक अपेक्षा आणि स्वतःच्या आयुष्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा, तर दुसरीकडे कल्पनारम्य विश्व, साहस, प्रेम आणि थराराने भरलेल्या मालिका अशा वैविध्यपूर्ण आशयातून क्विक टीव्ही आणि मोज प्लस यांनी ऑक्टोबरमधील आपले कार्यक्रम सादर केले आहेत. केवळ मनोरंजन न करता बदलत्या सामाजिक विचारांचे आणि नातेसंबंधांमधील गुंतागुंतीचे प्रतिबिंब दाखवण्याचा या कथांचा प्रयत्न आहे.

_क्विक टीव्ही आणि मोज प्लसवरील या सर्व नव्या मालिका ऑक्टोबर महिन्यात केवळ याच व्यासपीठांवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत._

IPRoyal Pawns