श्रावणोत्सवात ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार ‘आई तुळजाभवानी’च्या बालरूपाची अद्भुत लीला!

श्रावणोत्सवात ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार ‘आई तुळजाभवानी’च्या बालरूपाची अद्भुत लीला!

पहा ‘आई तुळजाभवानी’, रात्री ८.५०, आपल्या कलर्स मराठीवर!

‘कलर्स मराठी’वरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’मध्ये प्रेक्षकांसाठी सध्या चातुर्मासाचे भक्तीमय पर्व सुरू आहे. त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत लाडक्या ‘इंदूचे पात्र साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी बालकलाकार सांची भोयर आता पुन्हा एकदा ‘कलर्स मराठी’च्याच कुटुंबात एका नव्या प्रवासासाठी परतत आहे. येत्या १३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पवित्र श्रावण महिन्याच्या आणि नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर प्रेक्षकांना साक्षात तुळजाईच्या बालरूपाचा हा भव्य खुलासा पाहायला मिळणार आहे. सांची लहान तुळजाईच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जेव्हा देवी वाड्यात कुठेच सापडत नाही आणि चिंताक्रांत भक्तांसमोर प्रश्न उभा राहतो की “ही दिव्य पोथी कोण उघडणार?”, तेव्हा अचानक गर्दीतून पुढे आलेली लहान तुळजाई ही दहा-बारा वर्षांची निरागस, तेजस्वी आणि बुद्धिमान मुलगी आहे, जिच्या बालरूपामागे साक्षात दैवी शक्ती दडलेली आहे. ती अतिशय शांतपणे “मी उघडते…” असे म्हणत पायऱ्या चढून देवीच्या मुख्य आसनावर जाऊन बसते आणि पोथीवर अलगद हात ठेवते. पोथीतून सुवर्णप्रकाश बाहेर पडतो आणि रिकाम्या पानांवर दिव्य अक्षरे उमटू लागतात. पद्मा अस्वस्थ होऊन जेव्हा तिला विचारते की “अगं पण… तू आहेस तरी कोण?”, तेव्हा त्या लहान मुलीचे रुपांतर साक्षात् आई तुळजाभवानीच्या भव्य, दिव्य रूपात होते तिने नऊवारी साडी, सुवर्ण अलंकार, मुकुट, हातातील त्रिशूळ आणि उजळणारा मळवट परिधान केले आहे. तिच्या भक्तिमय वाणीतून नागपंचमीची कथा जिवंत होते आणि अखेर उलगडतं की ही साधी मुलगी नसून साक्षात तुळजाईचं बालरूप आहे. ही लीला रचण्यामागे तुळजाईचा उद्देश काय आहे? हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये स्पष्ट होणार आहे. हे दृश्य पाहून पद्मा आणि उपस्थित सर्व भक्त थक्क होतात आणि आई तुळजाभवानीच्या चरणी लीन होऊन नमस्कार करतात.

या सुंदर अनुभवावर आणि भूमिकेवर बोलताना सांची भोयर म्हणाली ,”इंद्रायणी’च्या प्रवासानंतर पुन्हा एकदा ‘कलर्स मराठी’च्या या कुटुंबात परतताना सेटवर जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि खूप आनंद झाला. ‘छोटी तुळजाई’ हे फक्त एक पात्र नसून महाराष्ट्राच्या श्रद्धेशी जोडलेलं बालदैवी रूप आहे, त्यामुळे हे स्वीकारताना मनात एक वेगळीच जबाबदारीची भावना आली. ‘इंदु’ ही अगदी साधी मुलगी होती, पण ‘लहान तुळजाई’मध्ये बालपण आणि अंगातले देवत्व यांचा समतोल साधत तिचे तेज, आणि ठहराव आणण्यासाठी मला संवादफेक आणि देहबोलीवर विशेष मेहनत घ्यावी लागली. पोथी वाचतानाचा आणि त्या दैवी रूपात रूपांतरित होण्याचा अनुभव माझ्याही अंगावर अक्षरशः रोमांच उभे करणारा होता, जो माझ्या कायम लक्षात राहील. ‘इंद्रायणी’ सुरु असताना आणि त्यानंतर देखील प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम या नव्या आणि पवित्र प्रवासातही मिळेल आणि रक्ताच्या नात्यापेक्षा श्रद्धेचे नाते किती श्रेष्ठ असते ही भावना महाराष्ट्रातील प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचेल, अशी मला खात्री आहे.”

मालिकेच्या कथानकात या बालरूपाच्या आगमनामुळे रंजक आणि भावनिक वळण येणार आहे. भक्तांची श्रद्धा व आत्मविश्वासाची परीक्षा पाहण्यासाठी तुळजाई बालिकेचे रूप धारण करून वाड्यात प्रवेश करते. बालरूपातून आई तुळजाभवानी नागपंचमीची दिव्य कथा कशी उलगडणार, हे नक्की पहा ‘आई तुळजाभवानी’, रात्री ८.५०, आपल्या कलर्स मराठीवर!

IPRoyal Pawns