तीन मित्र आणि गोंधळाची भन्नाट सुरुवात!
‘मांजर’च्या पोस्टरने वाढवलं कुतूहल
१८ सप्टेंबरला होणार गोंधळाचा उलगडा
तीन मित्र… घरभर पसरलेला पसारा… आणि सगळा गोंधळ ! याच भन्नाट कुतूहलाची झलक दाखवत ‘मांजर’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे दृश्य पाहिल्यावर प्रश्न पडतोच, ‘मांजर’ आणि या सगळ्याचा काय संबंध आहे.
घरातला पसारा, बिनधास्त मित्रांची गँग आणि त्यांचं बेफिकीर जगणं … या चित्रातून ‘मांजर’ ही केवळ तीन मित्रांची गोष्ट नसून हसवणाऱ्या आणि गोंधळात टाकणाऱ्या घटनांची धमाल कॉमेडी असल्याची झलक मिळते. पोस्टरमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी भन्नाट किस्सा दडलेला आहे की काय, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘मांजर’चं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. चित्रपटात सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पोस्टरमध्ये या चौघांची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळते.
































