स्वर्गीय शांताबाई जोग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

स्वर्गीय शांताबाई जोग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२६ (४४ वे वर्ष)

दिनांक : १५ सप्टेंबर २०२६ ते १९ सप्टेंबर २०२६

मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा जपण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ, टिळकनगर यांच्या वतीने सोनल प्रॉडक्शन पुरस्कृत स्वर्गीय शांताबाई जोग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या प्रतिष्ठित स्पर्धेचे ४४ वे वर्ष असून, स्पर्धा १५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे.

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री स्वर्गीय शांताबाई जोग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा गेली चार दशके राज्यभरातील हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाट्यसंस्थांसाठी एक मानाचे व्यासपीठ ठरली आहे. अनेक नामवंत कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांनी या स्पर्धेतून आपल्या कलाप्रवासाची यशस्वी सुरुवात केली आहे.

यंदाच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील सर्व हौशी, प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाट्यसंस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, आणि मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेला अधिक बळकटी द्यावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री. आप्पा पराडकर यांनी केले आहे. उत्कृष्ट एकांकिकांद्वारे नवोदित कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना आपली कला सादर करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नाट्यसंस्थांनी प्रवेश अर्ज, स्पर्धेचे नियम व इतर माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा.

संपर्क :

– स्वप्निल – ९२२१०००३५५

– विशाल – ९६१९२५१५७५

IPRoyal Pawns