जिओ हॉटस्टार व अमिताभ बच्चन यांच्या सहकार्याने प्रेक्षकांना मिळणार लाईव्ह स्ट्रीमिंगचा अनुभव

जिओहॉटस्टार आणि अमिताभ बच्चन यांनी स्पेशल लाइव्हस्ट्रीमच्या माध्यमातून रामनवमीचा पवित्र महिन्याच्या अनुभव देण्यासाठी केली हातमिळवणी

अमिताभ बच्चन रामकथेचे वर्णन करण्यासह या सेलिब्रेशन्समध्ये आरती, पवित्र स्थळांवरील विधी आणि प्रभू श्रीरामाच्या वारसाला सन्मानित करणाऱ्या प्रतिष्ठित कलाकारांद्वारे संगीतमय मानवंदना सादर करतील.

जिओहॉटस्टार भारतातील अधिकाधिक प्रेक्षकांसाठी लाइव्ह स्ट्रीमिंगचा अनुभव उपलब्ध करून देत आहे, ज्यामुळे लाखो लोकांना त्यांच्या आवडत्या कार्यक्रमांशी सहजपणे संलग्न होता येत आहे. कोल्डप्लेचे म्युझिक ऑफ द स्फेअर्स आणि महाशिवरात्री : द डिव्हाइन नाइट लाइव्हस्ट्रीमच्या भरघोस यशानंतर, ज्याने लाखो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, आता हा प्लॅटफॉर्म ६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत अयोध्येतून एका खास लाइव्हस्ट्रीमसह रामनवमीचा उत्सव प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सज्ज झाला आहे. अमिताभ बच्चन या सेलिब्रेशन्समध्ये रामकथेतील भावपूर्ण गाथा सांगतील. सामुदायिक उत्सवांना तंत्रज्ञानाशी जोडून हे लाइव्हस्ट्रीम जिओहॉटस्टारच्या सांस्कृतिक वारशाला जवळ आणण्याच्या आणि लाखो प्रेक्षकांना संस्मरणीय अनुभव देण्याच्या कटिबद्धतेला दाखवते.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी अमिताभ बच्चन प्रभू श्रीरामाच्या मूल्यांवरील कालातीत ज्ञान आणि चिंतन सामायिक करतील, आपल्या सांस्कृतिक वारशाचा उत्सव सादर करतील आणि भारतासाठी भविष्यकालीन दृष्टिकोनाला प्रेरणा देतील. या उत्सवात प्रभू श्रीरामाच्या जन्माचा व प्रवासाचा आनंद आणि श्रद्धा व्यक्त केली जाईल, ज्यामध्ये रामायणातील सात कांडांचे चित्रण केले जाईल, जे रामजन्मभूमीवरून थेट प्रक्षेपण करून प्रेक्षकांना त्यांच्या वारशाने आध्यात्मिकरित्या प्रगत करतील. अमिताभ बच्चन मुलांसोबत परस्परसंवादात्मक सत्र देखील आयोजित करतील, ज्यामध्ये निवडक कथा आणि ओव्या आकर्षक व उमजण्याजोग्या पद्धतीने सादर केल्या जातील. अयोध्या येथे झालेल्या विशेष पूजा, मंदिरांमधील पवित्र विधी, भद्रचलम, पंचवटी, चित्रकूट आणि अयोध्या येथील मन:शांती देणाऱ्या लाइव्ह आरती, भक्तीमय भजन आणि कैलाश खेर व मालिनी अवस्थी यांच्यासह आदरणीय कलाकारांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक सादरीकरणांपर्यंत हे लाइव्हस्ट्रीम भक्ती आणि एकतेची सामूहिक भावना जागृत करेल.

या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत जिओहॉटस्टारचे प्रवक्ता म्हणाले, “आमच्या लाइव्ह स्ट्रीमिंग क्षमतांनी आम्हाला भारतभरातील प्रेक्षकांना सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अनुभव देण्यास सक्षम केले आहे. लाइव्ह् स्पोर्ट्स, अहमदाबादमधील कोल्डप्ले – लाइव्ह, नुकतेच महाशिवरात्री : द डिव्हाइन नाइटचे १४ तासांचे लाइव्हस्ट्रीम अशा इव्हेण्ट्सना मिळालेल्या उत्स्फूर्त यशामधून आम्हाला मर्यादांना दूर करण्यास आणि भारतातील प्रेक्षकांना अद्वितीय अनुभव देण्यास प्रेरणा मिळाली आहे. रामनवमी हा आपल्या देशामधील अत्यंत पवित्र सण आहे आणि आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यामधील लाखो व्यक्तींपर्यंत या पवित्र सणाचे सादरीकरण पोहोचवण्याबाबत सन्माननीय वाटत आहे. अमिताभ बच्चन प्रभू श्रीरामाच्या प्रवासाचे वर्णन करणार असल्याने हा अनुभव या शुभ प्रसंगी सखोल भावना जागृत करण्याची खात्री देतो.”

 अमिताभ बच्चन म्हणाले, “अशा पवित्र प्रसंगाचा भाग होणे जीवनातील अमूल्य सन्मान आहे. रामनवमी सणापेक्षा सखोल चिंतन करण्याचा क्षण आहे, प्रभू श्रीरामांनी साकारलेल्या धर्म, भक्ती आणि धार्मिकतेच्या आदर्शांना स्वीकारण्याचा काळ आहे. जिओहॉटस्टारच्या माध्यमातून, आपल्याला तंत्रज्ञानाची क्षमता मिळाली आहे, जी श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्माच्या अभूतपूर्व उत्सवात देशभरातील व्यक्तींना एकत्र आणते.”

IPRoyal Pawns