सचिन चिटणीस, या चित्रपटास मिळत आहेत….
‘रील स्टार’ हा चित्रपट भानुदास (भूषण मंजुळे) नावाच्या एका सामान्य रस्त्यावरील विक्रेत्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या स्वप्नपूर्तीच्या अनोख्या संघर्षावर आधारित आहे. भानुदासची रील बनवण्याची कला, त्याचा संघर्ष आणि यातून तो सत्ता, संघर्ष, जाती-पातीचे राजकारण आणि पैशाच्या पॉवरगेमशी कसा भिडतो हे यात दाखवले आहे.
लेखन: सुधीर कुलकर्णी यांचे असून काही ठिकाणी ते प्रचंड परिणामक झाले आहे.
हा चित्रपट मल्याळम चित्रपट उद्योगातील तंत्रज्ञांची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट आहे. (उदा. संगीतकार, डीओपी, संपादक). यामुळे चित्रपटाच्या निर्मितीचे मूल्य खूपच चांगले झाले आहे.
दिग्दर्शन सिम्मी जोसेफआणि रॉबिन वर्गिस यांचे असून त्यांनी चित्रपटाला पुरेपूर न्याय दिला आहे.
निर्माते, जोस अब्राहम, मोनिका, निशील कंबाती (जे-फाइव्हज एंटरटेनमेंट्स, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्स), संगीत – विनू थॉमस, शुभम भट. गीतकार – गुरु ठाकूर आणि मंदार चोळकर.
मुख्य अभिनेता भूषण मंजुळे (भानुदासच्या भूमिकेत) सुंदर काम केले आहे. सह-कलाकार – प्रसाद ओक (पत्रकाराच्या भूमिकेत), उर्मिला जे जगताप, मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, विजय पाटकर, शुभांगी लाटकर, अनंत महादेवन, कैलाश वाघमारे आणि बालकलाकार अर्जुन गायकर, तनिष्का म्हाडसे. क्रिएटिव्ह निर्माते – महेंद्र पाटील.
वितरण – सिनेपोलीस, चित्रपटात वेगवेगळ्या मूड्सची आणि प्रसंगांना अनुसरून एकूण पाच गाणी आहेत, ज्यांना मल्याळम चित्रपटसृष्टीतील संगीतकार विनू थॉमस यांनी संगीत दिले आहे.
हा चित्रपट एका सामान्य माणसाचा संघर्ष, त्याची स्वप्नं आणि त्याने व्यवस्थेला दिलेले आव्हान यावर प्रकाश टाकतो, ज्यामुळे तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.
* एका सामान्य माणसाने मनापासून सत्तेच्या बाजूने उभा राहिल्यास तो संपूर्ण सिस्टीम कशी वठणीवर आणू शकतो, हे यात दाखवले आहे.*































