“जगू आनंदे निघू आनंदे……” फनरल

“जगू आनंदे निघू आनंदे……” फनरल

सचिन चिटणीस
या चित्रपटाला मिळत आहेत – 4*

प्रत्येक जन्माला आलेला माणूस हा मरणार असतो, काही लोकं हे अटळ सत्य मानायलाच तयार नसतात उलट सतत घाबरत असतात व एका ठराविक वया नंतर ते मिळालेले जगणं सोडून सतत मरणाची भीती बाळगत जगत असतात. मात्र या जगण्यासोबत मरणाचाही आनंद जर प्रत्येक माणसाने घेतला तर …..तर तो एक ‘फनरल’ असेल हाच आपल्या चित्रपटाचा नायक ( हिरा ) आरोह वेलणकर याच्या डोक्यात ही अफलातून कल्पना येते आणि तो ही कल्पना आपल्या मित्रांना सांगतो, सुरवातीला त्याचे मित्र त्याला वेड्यात काढतात पण मग हळूहळू ते हिरा बरोबर येतात.

ज्या माणसाला त्याच्या मरणानंतर त्याची अंतिम यात्रा कशी जावी हे एका फॉर्म मध्ये भरून द्यायचे मग नंतर त्या माणसाची अंतीम यात्रा त्याच्या इच्छेनुसार काढली जाते.

यात लाफटर क्लब च्या मोरे आजींना हसत हसत निरोप देणे असो, कोणाला ढोलताश्यात जायचे असते तर कोणाला आपल्या तरुण वयातील प्रेमिकेच्या घर वरून जायचे असते तर कोणाला मोगऱ्याची झाड व्हायचे असते अशी एक ना अनेक भन्नाट कल्पना असतात आणि त्या सर्व ‘सुखांत’ ही हिराची कंपनी मूर्त स्वरूपात आणत असतात.

हिराच्या आजोबांना बिलकुल पसंत नसलेला हा ‘धंदा’ नंतर आपला नातू लोकांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करतोय हे बघून ते सुद्धा आपली शेवटची इच्छा पूर्ण करून घेतात.

सर्व कलाकारांची कामे उत्तम झाली असून खास करून आरोह ला एक उत्तम ब्रेक मिळाल्याचे जाणवते व आरोह ने त्याचे सोने केले आहे.

“जीव आनंदे यावा, जीव आनंदे जावा” असा आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा दृष्टिकोण घेऊन आलेल्या ‘फनरल’ चित्रपट शेवटी आपल्याला विचार करायला लावतो तो जसे जीवनाकडे बघण्याचा पॉझिटीव्ह दृष्टीकोण ठेवावयास हवा तसेच मारणाकडेही बघण्याचा दृष्टिकोण पॉझिटिव्ह च हवा हे मनावर बिंबवून जातो.

चित्रपटातील “जगू आनंदे निघू आनंदे……” हे अतिशय सुंदर गीत त्याबरोबर ‘विषय कट’ हे प्रेमगीत तसेच ‘पंखा फास्ट करू दे’ पार्टी सॉंग सुद्धा उत्तम जमून आली आहेत.

‘फनरल’ चित्रपटाचे संकलन निलेश गावंड तर छायांकन अनुराग सोळंकी यांनी केले आहे. कलादिग्दर्शन मनोहर जाधव आणि महेश साळगांवकर यांचे आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत अद्वैत नेमळेकर तर साऊंडची जबाबदारी सूर्या मुकादम आणि गंधार मोकाशी यांनी सांभाळली आहे. क्रीएटीव्ह दिग्दर्शक रमेश दिघे आणि श्रीपाद जोशी आहेत. असोशिएट निर्माते प्रदीप दिघे आहेत. कार्यकारी निर्माते प्रसाद पांचाळ तर सहाय्यक निर्माते विश्वास भोर व सचिन ढमाले आहेत. सहाय्यक दिग्दर्शक दीप व्यास तर चीफ सहाय्यक दिग्दर्शक डॉ. गिरीश मोगली आहेत.
आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे यात मार्टिन कावळा सुद्धा आहे बरं का!
सर्वसामान्यांच्या जीवनाला भिडणारा “जगू आनंदे निघू आनंदे संग आनंदे वैकुंठा” असा विषय घेऊन बनवलेला ‘फनरल’ हा चित्रपट जरूर जरूर पहावा.

प्रस्तुती – ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’
निर्माते – लेखक – रमेश दिघे
दिग्दर्शक – विवेक दुबे
असोशिएट निर्माते – प्रदीप दिघे
कार्यकारी निर्माते – प्रसाद पांचाळ
सहाय्यक निर्माते – विश्वास भोर, सचिन ढमाले
संकलन – निलेश गावंड
छायांकन – अनुराग सोळंकी
कलादिग्दर्शन – मनोहर जाधव, महेश साळगांवकर
संगीत-पार्श्वसंगीत – अद्वैत नेमळेकर
साऊंड- सूर्या मुकादम,गंधार मोकाशी
क्रीएटीव्ह दिग्दर्शक – रमेश दिघे, श्रीपाद जोशी

*कलाकार*
आरोह वेलणकर – हिरा
तन्वी बर्वे – मीनल
विजय केंकरे – हिरा आजोबा
संभाजी भगत – कचरु
प्रेमा साखरदांडे – मोरे आजी
हर्षद शिंदे – सूर्या
पार्थ घाटगे – विनोद
सिद्धेश पुजारे – सदा

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns