पद्मश्री वात्सल्यमूर्ती सुलोचना लाटकर अर्थात सुलोचना दीदी यांचे आज म्हणजेच रविवार दिनांक ४ जून २०२३ रोजी निधन झाले त्या ९३ वर्षाच्या होत्या.
दादर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते
मान्यवरांच्या प्रतिक्रिया –
सुलोचना दिदी प्रेमळ आईचे प्रतिरुप होत्या. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. पडद्यावर आणि पडद्याबाहेर देखील त्या सुहृद व्यक्ती होत्या. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो – राज्यपाल रमेश बैस
“चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
“भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत” – विरोधी पक्षनेते अजित पवार
सुलोचना दीदींच्या निधनाने सिनेसृष्टीसह महाराष्ट्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार