आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे संशोधनासाठी थेट हिमालयात!

*आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे संशोधनासाठी थेट हिमालयात!*

*पुणे/मुंबई/नाशिक*: आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, कृषी तंत्रज्ञान अभ्यासक प्रा किरणकुमार जोहरे हवामान व भुकंप आदींच्या अभ्यासासाठी तसेच त्यांनी डिझाईन केलेल्या काही निवडक उपकरणांच्या परीक्षण व कॅलिब्रेशनसाठी थेट हिमालयात दाखल झाले आहे. आपल्या वैयक्तिक खर्चाने त्यांचा हा हिमालयातील चौथा अभ्यास दौरा असून संशोधनातून मिळालेले निष्कर्ष रिपोर्ट प्रा किरणकुमार जोहरे हे राष्ट्रीय हितासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील नेहमी प्रमाणे कळविणार आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी गेली ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते संशोधन करीत आहेत. २०५० साली जगाची लोकसंख्या १० अब्ज होईल आणि सध्या पृथ्वी वरील ८ अब्ज एक तृतीयांश लोकसंख्या दररोज अन्नधान्य अभावी उपाशी झोपते. बदलते हवामान आणि जागतिक अन्नसुरक्षा ध्येय गाठण्यासाठी एकाही शेतकर्यांने आत्महत्या करू नये तसेच सकारात्मक विचाराने शेतकर्यांची व पर्यायाने देशाची आर्थिक उन्नतीसाठी व अखिल मानवजातीच्या भुकेची समस्या सोडविण्यासाठी प्रा किरणकुमार जोहरे संशोधन करीत कार्यरत आहेत. प्रा किरणकुमार जोहरे यांनी डिझाईन केलेल्या हवामान केंद्राला (वेदर स्टेशन फाॅर फार्मस) ला भारत सरकारच्या कोलकाता येथील पेटंट कार्यालयातर्फे औद्योगिक विकासाच्या उपयोगासाठी (सर्टिफिकेट नंबर १०३६४७) नाविन्यपूर्ण वैयक्तिक पेटंट बहाल करण्यात आले आहे.

हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी ४ आॅक्टोबर २०१० रोजी पुणे येथे ढगफुटी होण्याआधी ९० मिनिटात १८२ मिलीमिटर पाऊस झालेल्या ढगफुटी (फ्लॅशफ्लड) ची होण्याआधीच दुपारी आगाऊ सुचना देऊन हजारो नागरिकांचे प्राण वाचविले.

तसेच गेली १५ वर्षे प्रा किरणकुमार जोहरे हे ‘अंदाज नव्हे माहिती!’ ह्या विनाअनुदानित व विनामोबदला राष्ट्रीय हवामान अलर्ट व हवामान माहिती सेवेचे प्रणेते आहेत. आत्मनिर्भर भारत अभियानासाठी निवडलेल्या २० व्यक्तींमध्ये जोहरे हे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती आहेत. ‘नेशन फर्स्ट’ ही मोहीम देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी १९९४ साली सुरू करीत ‘ध्येय’ मासिक पत्रिका सुरू करीत युवकांमध्ये सकारात्मक विचारांचे बिजारोपन सुरू केले होते. भारत सरकारच्या क्रीडा विभागाने त्यावेळी न
नाशिक जिल्हा युवा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आराखडा, आत्मनिर्भर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेती, हवामान आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल याबाबत प्रा किरणकुमार जोहरे हे गुजरात व अन्य राज्यांच्या कृतीशिल कार्यक्रमात सहभागी होत आलेले आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांती होत असतांना नैसर्गिक बुद्धीमत्ता आणि साधनसंपत्तीचा सुयोग्य उपयोगाबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निग (एमएल), इंटरनेट आॅफ थिंग्ज (आयओटी) आदी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर हवामान बदल तसेच मान्सून व चक्रीवादळांचा बदललेला पॅटर्न लक्षात घेत व देशी बी-बियाणे वापरत, बहुपिक पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने शेतीसाठी करण्यात विविध प्रयोग प्रा किरणकुमार जोहरे करीत आले आहेत. स्वावलंबी भारत घडविण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावत व थेट मातीत उतरून प्रा किरणकुमार जोहरे कार्यरत आहेत. मातीतील आॅरगॅनिक कार्बन (सेंद्रिय कर्ब) वाढवत असतांना विषमुक्त सकस अन्न निर्मिती व अन्न प्रक्रिया तसेच पर्यावरण संतुलन चक्रात गाईचे महत्व यांद्वारे कृतीशील आराखडा बनविण्यात देखील ते सहभागी आहेत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय व त्यांचे लाडके दादा असलेले भौतिकशास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे ढगफुटी (फलॅशफ्लड) तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटियरोलाॅजी (आयआयटीएम) या हवामान संशोधन संस्थेचे माजी शास्त्रज्ञ आहेत. ४ आॅकटोबर २०१० साली पाषाण पुणे येथील ढगफुटी म्हणजे ९० मिनिटात १८२ मिलीमीटर झालेला पाऊस होण्याआधीच सांगितला होता. प्रा किरणकुमार जोहरे हे एकमेव असे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ आहेत ज्यांनी हवामानाचा अचूक वेध घेणारी बनविलेली उपकरणे आजही पृथ्वीच्या दक्षिणध्रुव म्हणजे अंटार्टिका आणि उत्तर ध्रुव म्हणजे आर्टिक्टवर कार्यक्षम आहेत. मान्सून, चक्रीवादळ, विजा, गारा, ढगफुटी, महापूर, दुष्काळ आदी हवामान विषयक माहिती तातडीने देत पिकनियोजनाने कोट्यावधी रुपयांचा आर्थिक फायदा त्यांनी हजारो शेतकर्यांना करून दिली आहे.

अनेक पेटंट व आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच रिसर्च पेपर्स प्रकाशित असलेले प्रा किरणकुमार जोहरे हे सध्या प्रा.किरणकुमार जोहरे हे पुणे विद्यापीठात डॉ ए डी शालिग्राम व के व्हि एन नाईन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही जी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली इंटरनेट आॅफ थिंग्ज आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या सहाय्याने अॅटोमेशन विषयी पीएचडी करीत असून नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वरीष्ठ महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक विभागात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत असून संस्थेचे सरचिटणीस एडव्होकेट नितीन ठाकरे, संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव, प्राचार्य डॉ आर डी दरेकर, विभाग प्रमुख प्रा एस एस डेमसे आदींचे प्रोत्साहन व सहकार्य त्यांना लाभत आहे.

*ढग निर्माण प्रक्रिया व भुकंपांचा संबंध यांचाही अभ्यास यावेळी प्रा किरणकुमार जोहरे करणार असून, भुकंपाचे ढग कसे बनतात हे भुकंप होण्याआधी, होतांना व नंतर होणारी जटिल प्रक्रिया जनहीतासाठी ‘अचूक भुकंप अलर्ट’ देतांना अभ्यासाचे आहे.*

+1
90
+1
29
+1
0
+1
0
IPRoyal Pawns