प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासोबत पहावा असा ‘पल्याड’

प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासोबत पहावा असा ‘पल्याड’

 

करोनामुळे मुलांमध्ये अभ्यासाविषयी आलेला दुरावा आणि मोबाईल फोनच्या वापरामुळे कमी झालेले शाळेचे आकर्षण तसेच पालक आणि शिक्षक ह्यामध्ये निर्माण झालेली दरी ही वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचे पालक आपल्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी कष्ट करून सर्व सुखसोयी उपलब्ध करतात. असे असतानाही मुलांनी अभ्यासाकडे आणि शिक्षणाकडे पाठ फिरवलेली दिसते आहे. याउलट “पल्याड” या चित्रपटामध्ये शंभूची शाळेविषयीची ओढ आणि त्यामागील धडपड बघायला मिळते. आईं आपल्या मुलाला शिकता यावे आणि अघोरी रूढी – प्रथेविरुद्ध पूर्ण गावाच्या विरुद्ध उभी राहते. शिक्षण हा पल्याड या चित्रपटाचा मुख्य गाभा असून प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासोबत पाहावा असा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

मनाला भिडणारं गीत-संगीत आणि वास्तवदर्शी चित्र यामुळं वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात ‘पल्याड’ यशस्वी झाल्याचं सिनेमागृहांमध्ये पहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. ‘पल्याड’ची निर्मिती एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाईफ आणि लावण्यप्रिया आर्टसच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेश भिमराव दुपारे यांनी केलं आहे.

‘पल्याड’ पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. समाजातील जाचक रुढी, परंपरा आणि विचारसरणीला मूठमाती देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावत आहे. आजही समाजात प्रचलित असलेल्या परंपरांवर प्रहार करताना अतिरंजीतपणा मोह टाळत दिग्दर्शक शैलेश दुपारे यांनी दाखवलेलं वास्तवदर्शी चित्र प्रेक्षकांना भावत आहे. सिनेमागृहातून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं पाहिल्याचं समाधान आणि डोळ्यात अश्रू दिसत आहे. चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया इतरांच्या मनात ‘पल्याड’बाबतची उत्सुकता वाढवण्याचं काम करत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील कथानक असूनही शहरी भागातील प्रेक्षकवर्गही ‘पल्याड’वर फिदा झाला आहे. प्रत्येक पालकाने त्यांच्या परिवारासोबत हा चित्रपट बघितला तर नक्कीच त्यांचा मुलांवर याच्या सकारात्मक परिणाम होऊ शकतो असा आशावाद दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांनी व्यक्त केला आहे.

शशांक शेंडे आणि देविका दफ्तरदार या मातब्बर कलाकाराच्या साथीनं रुचित निनावे या चंद्रपूरमधील बालकलाकारानं केलेला अभिनय मनाला भिडत आहे. दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांनी पदार्पणाच्या सिनेमासाठी एका महत्त्वपूर्ण विषयाला वाचा फोडल्याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे. वर्तमान काळात सुरू असलेल्या ट्रेंडमधील चित्रपटांपेक्षा ‘पल्याड’ खूप वेगळा आहे. ‘पल्याड’वर केलेल्या प्रेमाबद्दल चित्रपटाची संपूर्ण टिम मायबाप रसिकांचे शतश: ऋणी असल्याची भावना दिग्दर्शक शैलेश दुपारे यांनी व्यक्त केली आहे. ‘पल्याड’ला मिळालेलं हे यश म्हणजे पूर्ण युनिटनं घेतलेल्या मेहनतीचं फळ असल्याचे मत निर्माते श्री पवन सादमवार, सूरज सादमवार, मंगेश दुपारे आणि प्रणोती पांचाळ पांचाळ आणि व्यक्त केलं आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns