लेखक, नाट्यसमीक्षक, पत्रकार जयंत पवार यांचे निधन

जयंत पवार (२२ फेब्रुवारी १९६०) हे मराठीतील महत्त्वाचे प्रयोगशील लेखक आहेत. १९७८ पासून त्यांनी

नाट्यलेखनाला सुरुवात केली. नाटक आणि कथा या दोन्ही साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन करून मराठी साहित्यात आपले
वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाट्यसमीक्षक म्हणूनही जयंत पवार यांची स्वतंत्र ओळख आहे. त्यांनी सुमारे तीन दशके
नाट्यसमीक्षालेखन केले आहे. त्यांचे कथेतर गद्य, भाषणे, मुलाखती असे प्रकाशित पण अद्याप असंकलित असलेले
लेखनही वाचकांना वेगळी अंतर्दृष्टी देणारे आहे. ‘चंदेरी’, ‘नवशक्ती’, ‘आपलं महानगर’, ‘सांज लोकसत्ता’, ‘लोकसत्ता’
आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ यांमधून सुमारे १९८६ पासून पत्रकारिता करीत होते.

‘वंश’, ‘अधांतर’, ‘माझं घर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन’, ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट’,
‘लिअरने जगावं की मरावं?’ इत्यादी नाटकांचे त्यांनी लेखन केले आहे. या सर्व नाटकांचे व्यावसायिक, प्रायोगिक व हौशी
रंगभूमीवर प्रयोग झाले आहेत. ‘दरवेशी’, ‘मेला तो देशपांडे’, ‘कार्य सिद्धीस नेण्यास श्री (अ)समर्थ आहे’, ‘उदाहरणार्थ’,
‘दुजा शोक वाहे’, ‘होड्या’, ‘घुशी’, ‘लिअर’, ‘वाळवी’, ‘विठाबाईचा कावळा’, ‘अशांती पर्व’, ‘जळिताचा हंगाम’,
‘अंतिम रेषा आणि द्वंद्व’, ‘अजून एक पक्षी’, ‘शेवटच्या बीभत्साचे गाणे’ इत्यादी २३ एकांकिकांचे त्यांनी लेखन केले
आहे.
‘अधांतर’, ‘माझं घर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन’ या जयंत पवारांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीवर
स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. या सर्व नाटकांचा अवकाश हा महानगरीय आणि विशेषत: मुंबई शहराचा असला तरी त्यातून उपस्थित केलेले प्रश्न आजचे, आजच्या काळाचे आणि जागतिक पातळीवरील सर्व महानगरांचे आहेत. माणसांची मुळं हरवणं, त्यांचं स्थलांतर, विस्थापन, निर्वासित होणं, त्यांना वेढून टाकणारी राजकीय परिस्थिती, त्यातली त्यांची हतबलता व अगतिकता हे या नाटकांचे कळीचे मुद्दे आहेत; पण ही नाटकं या प्रश्नांना सर्व अंगांनी भिडून त्याच्याही पुढे जात मानवी अस्तित्वाशी निगडित मूलभूत विचार प्रश्न म्हणून उपस्थित करतात आणि त्यांची तत्त्वचिंतनात्मक पातळीवर मांडणी करतात. जयंत पवार यांच्या लेखनामधून मुंबई अनेक अंगांनी दिसली. तिच्यातलं कामगारांचं, वंचितांचं विश्व दिसल, या विश्वाकडे ते अत्यंत सहृदयतेने बघतात. हे विश्व त्यांच्या लेखनात वास्तव आणि कल्पिताच्या मिश्रणातून येतं.
त्यांच्या ‘अधांतर’ या नाटकाला राम गणेश गडकरी महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन ललित
साहित्य गौरव, नाट्यदर्पण, जयवंत दळवी स्मृती नाट्यलेखन पुरस्कार आदी १४ विविध लेखन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकालाही अण्णासाहेब किर्लोस्कर महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार व रा. शं. दातार
नाट्यलेखन पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘अधांतर’ या नाटकाचे हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाले
आहेत.
जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या पहिल्याच कथासंग्रहाला २०१२ सालच्या ‘साहित्य
अकादमी’ पुरस्काराने गौरवले गेले. जयंत पवार यांनी तेरावे ‘विद्रोही साहित्य संमेलन’ (२०१५) आणि पंधरावे ‘कोकण
मराठी साहित्य संमेलन’ (२०१५) यांचे अध्यक्षपद भूषविले आहे.

: वंश (अभिनव प्रकाशन, मुंबई), अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय (पॉप्युलर प्रकाशन), टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन (मुक्तशब्द प्रकाशन), लिअरने जगावं की मरावं? (पंडित पब्लिकेशन्स, कणकवली) ही नाटके पुस्तकरूपाने प्रकाशित. ‘अधांतर’ या नाटकाचा ‘अभी रात बाकी हैं’ हा हिंदी अनुवाद (वाणी
प्रकाशन, दिल्ली) प्रकाशित. अनुवादक : कैलाश सेंगर
एकांकिका लेखन : ‘दरवेशी आणि इतर एकांकिका’ (त्रिदल प्रकाशन, मुंबई) आणि ‘नाद’, ‘निनाद’, ‘पडसाद’ ( पंडित
पब्लिकेशन्स, कणकवली) हे एकांकिकासंग्रह पुस्तकरूपाने प्रकाशित.
: १. १९९१ साली दूरदर्शनसाठी अरविंद गोखले यांच्या कथांवर आधारित ‘कथनी’ या दूरदर्शन
मालिकेच्या काही भागांचे पटकथा व संवादलेखन केले.
२. ‘दु:खाचे श्वापद’ (मराठी) व ‘ब्रेकिंग न्यूज’ (हिंदी) या चित्रपटांचे पटकथा व संवादलेखन केले.
३. ‘अधांतर’ नाटकावर आधारित ‘लालबाग परळ’ (मराठी) व ‘सिटी ऑफ गोल्ड’ (हिंदी) या महेश
मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटांचे कथा, पटकथा व संवादलेखन केले.
४. ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट’ या कथेवर विश्वास पाटील दिग्दर्शित ‘रज्जो’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती.
कथासंग्रह : ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ (२०१०), ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोंचा’ (२०१५) दोन्ही
कथासंग्रह लोकवाङ्मय गृह, मुंबई तर्फे प्रकाशित
वैचारिक : बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (लोकवाङ्मय गृह, मुंबई)

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns