विधानसभेत गदारोळ घातल्या प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन

आज विधानसभेतील गदारोळ प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले. संजय कुटे, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, राम सातपुते, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, अशिष शैलार, नारायण कुचे, पराग अळवणी, शिरीष पिंपळे, योगेश सागर, किर्तीकुमार बागडिया या सदस्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
दुपारी विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांना दालनात धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नबाब मलिक यांनी केली, यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले, सभागृहात लांच्छनास्पद घटना घडली आहे. मी ३६ वर्षाच्या राजकीय कारकीदींत महाराष्ट्राच्या विधिमंडळात असा प्रकार पाहिला नाही.
सभागृहातील गोंधळानंतर विरोधक आणि सत्ताधारी
एकत्र बसून तोडगा काढतात, मात्र विधानसभेत केलेल्या
कारवाईचा निषेध करत भाजप सदस्यांनी सभागृहाचा त्याग केला.
‘अधिवेशनात विविध प्रकरणं काढू या भितीनेच आमच्या आमदारांचे निलंबन करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns