नाट्यनिर्माता राहुल भंडारे यांच्या दादर येथील कार्यालयात चोरी
प्रसिद्ध नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांच्या दादर पश्चिमेकडील जिप्सी हॉटेलच्या वर असलेल्या कार्यालयात चोरी.
भंडारे यांना दुसऱ्या दिवशी कार्यालयानजीक असलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयाचे शटर उघडे असल्याचे सांगितले. भंडारे यांनी जाऊन पाहणी
केली असता, कुलूप तोडण्यात आल्याचे लक्षात आले. कार्यालयातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. बारकाईने तपासणी केली असता, दोन लॅपटॉप
आणि चार हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे आढळून आले. भंडारे यांनी यासंदर्भात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरांचा शोध घेत आहेत.
गेले दिड वर्षापासून संपूर्ण नाट्यव्यवसाय कोरोनासारख्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे ठप्प झालेला आहे, अशातच नाट्यकार्यालयात चोरी होणं, नाटकाचे महत्त्वाचे दस्तऐवज, कागदपत्र, ऑफिशीअल डाॅक्युमेंट्स, दोन लॅपटाॅप्स आणि काही रोख रक्कम यांची चोरी होणं म्हणजे एका नाट्यनिर्मात्यासाठी दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखं आहे.
अशी प्रतिक्रिया राहुल भंडारे यांनी ‘मुंबई न्यूज 24×7’ शी बोलतांना दिली.