“काल जे काही विधिमंडळात घडले ते कितीही कोणी काहीही म्हणो महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणे होते ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले.
एकूणच हे सगळं बघितल्यानंतर कामकाजाचा दर्जा हा उंचवण्याकडे आहे का घालवण्या कडे आहे हेच कळत नाही. लोकप्रतिनिधींकडून जनतेची जी अपेक्षा असते ती कालच्या प्रकारामुळे शरमेने मान खाली जावी अशीच होती आणि हे एका जबाबदार पक्षाकडून घडले हे खूपच वाईट आहे. लोकशाहीत तुम्हाला तुमचे मत मांडण्याचा अधिकार नक्कीच आहे मात्र आरडाओरडा करून समोरील माइक खेचून जोरजोरात बोलून आपण आपले मत मांडणे हे आरोग्यदायी लोकशाहीची लक्षणे नाहीत. सभागृहामध्ये जे घडलं ते तर वाईट होतेच मात्र भास्करराव जाधव यांच्या दालनांमध्ये जे घडले ते अक्षरशः शिसारी आणण्यासारखे होते. महाराष्ट्रात हे असे काही घडू शकते यावर माझा काय कोणाचाच विश्वास बसणार नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी तुम्ही जर सत्ता एके सत्ता हाच विचार मनात धरून वागायचं ठरवलं असेल तर मला वाटते हे एकूणच दिवस वाईट आहेत, या दोन दिवसाच्या अधिवेशनात आम्ही जनतेला एक समाधान देऊ असे निर्णय घेतले आहेत त्याचा मला आनंद आहे ज्यांच्याकडून जे घडू नये ते घडलं त्यांनी ते लवकर सुधारावे अश्या मी त्यांना शुभेच्छा देतो.
काल जे काही विधिमंडळात घडले ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणे होते – मुख्यमंत्री
+1
+1
+1
+1