पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग, मात्र कोविशील्ड लस प्लांट सुरक्षित

करोना वरील कोविशील्ड लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली असून प्लांट सुरक्षित असल्याचे समजते या आगीत ४ कर्मचारी अडकले असल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने त्यांना सुखरूप बाहेर काढले.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बिसीजी प्लांट असलेल्या इमारतीमध्ये ही आग लागली, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून, गुप्तचर यंत्रणेने ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली आहे की अन्य काही कारणांमुळे याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

या आग लागण्याच्या घटनेकडे घातपाताच्या शक्यतेचा विचार करून त्यादिशेने तपास करायला हवा, असे आमदार मुक्ता टिळक यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही ही घटना गंभीर असल्याचे नमूद करत आग लागली की लावली याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे
महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग
नियंत्रणात आणण्यासाठी पावले टाकण्याच्या
सूचना दिल्या असून राज्याच्या यंत्रणेला देखील
त्यांनी निर्देश दिले आहेत. आता परिस्थिती
नियंत्रणात असल्याचेही नमूद करण्यात आले
आहे. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित
पवार या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. पुणे
जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि विभागीय
आयुक्त सौरभ राव यांच्याकडून अजित पवार
यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे.
तातडीची वैद्यकीय मदत व अन्य साह्य करण्याच्या
सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns