पु ल देशपांडे कला अकादमी मध्ये ‘स्वरगंधर्व सुधीर फडके दृकश्राव्य दालन’
राज्य सरकारने पु ल देशपांडे अकादमी मध्ये विशिष्ट दालन ठरवून केले आहे, ज्यामध्ये ध्वनी चित्रमुद्रणासाठी ३६० डिग्री क्रोमा स्टुडिओ अतिशय दर्जेदार बनवला असून त्यालाच लागून ध्वनीमुद्रणासाठी एक सुसज्ज स्टुडिओ उभारलेला असून बाजूलाच एडिटिंग, चेंजिंग रूम व बाकी गोष्टी करण्यासाठी पाच सुसज्ज कक्ष बांधण्यात आले आहेत. दृकश्राव्य माध्यमांसाठी तसेच संबंधित अभ्यासकांसाठी एक दालन ही केले असून, प्रिव्ह्यू कक्षही असणार आहे.
अशी अद्यावत व्यवस्था करण्यात आली असून त्याचे उद्घाटन ९ एप्रिल रोजी होणार असून या दालनास ‘स्वरगंधर्व सुधीर फडके दृकश्राव्य दालन’ असे संबोधण्यात येईल. त्यानंतर मिनी थिएटर मध्ये बाबूजींच्या गीतांचा कार्यक्रम असेल व तो विनामूल्य असेल.
*नाट्यगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत नाट्यप्रेमी मध्ये नाराजी आहे या प्रश्नावर बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले ‘ या ठिकाणी चित्रपट महोत्सव होणार ‘*
*सांस्कृतिक विभागातर्फे १०० दिवसांमध्ये जवळजवळ १७० कार्यक्रम केले असून येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२५ ते एप्रिल २०२६ या एका वर्षात १२०० कार्यक्रम राज्यभर करण्याचा सरकारचा मनसुबा असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले*
पाकिस्तानी कलाकार असलेला ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट मुंबई, महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्याने घेतला असून त्यास काही संघटनांचा विरोध आहे त्याबद्दल बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले “मला वाटते हे कायद्याचे राज्य असून कायदा आपले काम चोख करेल.”