भजनसम्राट नरेंद्र चंचल (८० ) यांचे दिल्लीतील अपोलो रुग्णालयात निधन झाले आहे. नरेंद्र चंचल हे गेल्या तीन महिन्यांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.
हॅलो हाय छोडीये, जय माता दी बोलीये हे त्यांचं भजन कम गाणं सुपरहिट झालेलं होतं..धार्मिक गाणी आणि स्तोत्रांमध्ये खास कौशल्य मिळवले.
नरेंद्र चंचल यांचा जन्म मंडी, अमृतसर येथील
धार्मिक पंजाबी कुटुंबात झाला होता. ते धार्मिक वातावरणात मोठे झाले आणि त्यांनी भजन
आणि आरती गाण्यास सुरुवात केली.
नरेंद्र चंचल यांनी १९७३ च्या बॉबी चित्रपटासाठी
“बेशक मंदिर मशिद….” हे गाणे गायले आणि त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक पुरस्कार मिळाला. अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याचे मानद नागरिकत्वही त्यांनी मिळवले.
चंचल यांनी मिडनाईट सिंगर नावाचे एक आत्मचरित्र प्रसिद्ध केले असून त्यात त्यांचे जीवन, संघर्ष आणि कष्टाचे वर्णन केले आहे.
“बेशक मंदिर मस्जिद तोडो” बॉबी १९७३
“मैं बेनाम हो गया ..” बेनाम १९७४
“बाकी कुछ बचा तो महंगाई मारगयी “रोटी कापडा और मकन १९७४ लता मंगेशकर , मुकेश आणि जानी बाबू सह
“तू ने मुझे बुलाया” आशा चित्रपटातील गाणे मोहम्मद रफी सह १९८०
“चलो बुलावा आया है माता ने बुलाया है” अवतार १९८३ आशा भोसले आणि महेंद्र कपूर सोबत.
“दो घुंट पिला दे साकी” काला सुरज १९८५
“हुये हैं कुछ ऐसा वो हमसे परये” अंजाने , कुमार सानू साधना सरगम सोबत २०००