‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ, मुंबई’ या संस्थेची नुकतीच मुदतपूर्व निवडणूक झाली. त्यानुसार, पुढील ५ वर्षांसाठी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
१) संतोष काणेकर – अध्यक्ष
२) ज्ञानेश महाराव – उपाध्यक्ष
३) राहुल भंडारे – प्रमुख कार्यवाह
४) सुशील आंबेकर – सह कार्यवाह
५) दिनेश पेडणेकर – कोष्याध्यक्ष
६) देवेंद्र पेम – सह कोष्याध्यक्ष
७) संजीवनी जाधव – सदस्य
८) ऐश्वर्या नारकर – सदस्य
९) पद्मजा नलावडे- सदस्य
१०) ऋतुजा चव्हाण-सदस्य
११) अनुराधा वाघ- सदस्य
“५० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा ५ कार्यकारिणी सदस्य स्त्री शक्ती असणे, ही या कार्यकारिणीची विशेष अभिमानाची निवड आहे.” अध्यक्षपदी निवडून आल्या नंतर मुंबई न्यूज शी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष काणेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
अतिवृष्टी असूनही या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी नाट्य निर्माता संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारिणी सदस्यांची निवड बिनविरोध झाली.
उपस्थित ज्येष्ठ सदस्यांनी संतोष काणेकर यांचे अभिनंदन केले. या मुदतपूर्व निवडणूक सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ नाट्य निर्माता प्रदीप कबरे होते. संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून समीर गुप्ते यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.