आज सकाळी सुमारे ९.१५ वाजण्याच्या दरम्यान सुप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ.अनिल अवचट ( ७७ ) ह्यांचे दीर्घ आजाराने पुणे पत्रकारनगर येथे राहत्या घरी निधन झाले. मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिले.
त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली.
त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे.
डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील असा दिलासा मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना दिला.
आज दुपारी दोन वाजेपर्यंत, पत्रकारनगर येथे त्यांचे पार्थिव, अंतिम दर्शनाकरता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार अंतिम संस्कार केले जातील.
लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचे दीर्घ आजाराने निधन
आज सकाळी सुमारे ९.१५ वाजण्याच्या दरम्यान सुप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट ( ७७ ) ह्यांचे दीर्घ आजाराने पुणे पत्रकारनगर येथे राहत्या घरी निधन झाले. मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिले.
त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली.
त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे.
डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील असा दिलासा मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना दिला.
आज दुपारी दोन वाजेपर्यंत, पत्रकारनगर येथे त्यांचे पार्थिव, अंतिम दर्शनाकरता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार अंतिम संस्कार केले जातील.
*अल्प परिचय*
पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्राची पदवी.
लेखन आणि सामजसेवेला वाहून घेतले.
तरुणांच्या व्यसनमुक्ती साठी ‘मुक्तांगण’ या संस्थेची स्थापना.
*ग्रंथ संपदा*
अमेरिका
अक्षरांशी गप्पा
आपले से’
आप्त
कार्यमग्न
कार्यरत
कुतूहलापोटी
कोंडमारा
गर्द
छंदांविषयी
छेद
जगण्यातले काही
जिवाभावाचे
दिसले ते
धागे आडवे उभे
धार्मिक
People : ‘माणसं’ पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर]]
(सहलेखक- विश्राम गुप्ते)
पुण्याची अपूर्वाई
पूर्णिया
प्रश्न आणि प्रश्न
बहर शिशिराचा : अमेरिकेतील फॉल सीझन
Beyond Work- Visionaries From
Another India : ‘कार्यरत’ पुस्तकाचे इंग्रजी
भाषांतर)
मजेदार ओरिगामी
मस्त मस्त उतार (काव्यसंग्रह)
माझी चित्तरकथा
माणसं!
मुक्तांगणची गोष्ट पुस्तक : (इंग्रजीत Learning to
Live Again)
मोर
रिपोर्टिंगचे दिवस
Learning to live again, “मुक्तांगण” पुस्तकाचे
इंग्रजी भाषांतर.
लाकूड कोरताना
वनात..जनात
वाघ्या मुरळी
वेध
शिकविले ज्यांनी
संभ्रम
सरल तरल
सुनंदाला आठवताना
स्वतःविषयी
सृष्टीत…गोष्टीत
सृष्टी-दृष्टी, वनात-जनात
हमीद
हवेसे
*पुरस्कार*
व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार.
अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव
पुरस्कार.
महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार.
२०१७ सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार.
“सृष्टीत.. गोष्टीत” या पुस्तकाला साहित्य
अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार.
डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे
महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तके” म्हणून जाहीर
केली आहेत.
अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय
लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव
करण्यात आला आहे.
सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे
दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार
साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार
महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार
डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती
केंद्राला १२व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता
सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला.
अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेकडून
साहित्य जीवन गौरव पुरस्कार.