राम सबके है, राम सब में है – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

दुमदुमली आयोध्यानगरी….
अयोध्येत कडेकोट पोलीस बंदोबस्त

भूमिपूजन सोहळ्यासाठी देशभरातून १७० मान्यवर कार्यक्रम स्थळी उपस्थित.
दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा शिलान्यास होणार.
भूमिपूजनासाठी खास चांदीचे फावडे.

राम नामाचा जप करत भगव्या, पिवळ्या पेहरावात अयोध्या नगरी सजली.
योगी आदित्यनाथ, सरसंघचालक, खासदार उमा भारती, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, बाबा रामदेव अयोध्येत दाखल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येत आगमन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हनुमानगढी येथे आगमन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हनुमानगढी येथे हनुमानाची पूजा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर भूमी सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या रामलल्ला च्या दर्शनासाठी पंतप्रधानांचा साष्टांग नमस्कार.

भूमिपूजनाच्या मुख्य सोहळ्यास सुरुवात.

भूमिपूजन सोहळ्यास विविध ठिकाणच्या नद्यांचे पाणी तसेच विविध राज्यातील माती आणण्यात आली आहे.
भूमिपूजन सोहळ्यात पाच रत्ने वापरले जाणार आहेत.
त्यात चांदीची शिळा, चांदीचे कासव, चांदीची तुळस, सोन्याचा शेषनाग व सोन्याचा वास्तूपुरुष आहे.

श्रीराम भूमिपूजन सोहळा संपन्न. राम मंदिरासाठी एकूण नऊ शिळांच पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजन.

राम मंदिराच्या टपाल तिकिटांचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण.

पंतप्रधान नरेंद्र मोदी – सियावर रामचंद्र की जय चा जयघोष करत पंतप्रधानांचे भाषणाला सुरुवात. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्याचा अभिमान. हा संपूर्ण देश प्रभू रामचंद्राच्या संकटाच्या चक्रव्यूहातून राम जन्मभूमी मुक्त, राम मंदिरासाठी अनेक पिढ्यांनी आयुष्य अर्पण केले. 120 कोटी भारतीयां तर्फे प्रभू श्रीराम ला वंदन. शरयू नदीच्या काठावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला गेला आहे. प्रभू श्रीराम आपल्या मनात वसलेले आहेत. श्रीराम मंदिर हे संस्कृतीचं, राष्ट्रीय एकात्मतेचे आधुनिक प्रतीक असेल. राम मंदिराकडून आस्था, श्रद्धा, संकल्पाची प्रेरणा.
राम मंदिर देशाला बळकट करण्याचा प्रयत्न करेल. राम मंदिर म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती, ही एक ऐतिहासिक घटना. आजचा दिवस कित्येक युगे भारताची पताका फडकावत ठेवेल. राम नाम लिहिलेल्या शिळा म्हणजे उर्जेचा स्त्रोत. भारताची अध्यात्मिकता म्हणजे जगासाठी प्रेरणेचा विषय.
भारताच्या अस्थेत राम भारताच्या दर्शनात राम.
सर्व व्यापी राम हे विविधेतल्या एकतेचे प्रतीक.
मुस्लिम बहुल इंडोनेशियातही राम पूजनीय.
राम सबके है राम सब में है.
अयोध्येतील राम मंदिर मानवतेला प्रेरणा देणार.
राम मंदिर हे वर्तमान व भविष्यातील पिढीची जबाबदारी.
काळानुसार चालणं ही प्रभू श्री रामाची शिकवण.
राम हे आधुनिकता व परिवर्तनाचे समर्थक.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ – गेल्या पाचशे वर्षापासून च्या स्वप्नाची पूर्तता, राम जन्मभूमीसाठी अनेकांचं बलिदान, आजचा दिवस म्हणजे गेल्या अनेक शतकांच फलित.

सरसंघचालक मोहनराव भागवत – आनंदाचा क्षण, गेल्या तीस वर्षाच्या कठोर परिश्रमाचे हे फळ, राम मंदिर भूमिपूजनामुळे देशभरात आनंदाचे वातावरण.

 

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns