चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर कोसळले झाड, एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची  माहिती 

मुंबईत मुसळधार पाऊस ; चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर कोसळले झाड, एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची  माहिती

एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची राहुल शेवाळे यांची माहिती तर एक मुलगा अजूनही बस मध्ये अडकला असून त्याला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. दहा विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.

​मुंबई आणि उपनगरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या गंभीर घटना समोर येत आहेत. यातच चेंबूर परिसरातील ११ नंबर रोडवर एका धावत्या शालेय बसवर अचानक एक भलामोठा वृक्ष कोसळल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

IPRoyal Pawns