सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा २९ मार्च २०२६ रोजी

*सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा २९ मार्च २०२६ रोजी*

गेल्या ४६ वर्षांपासून ठाण्याच्या भावी पिढीला घडवत शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय हे ठाण्यातील एक प्रतिष्ठित महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. *आदरणीय कै. सतीश प्रधान* यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या या महाविद्यालयातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक विद्यार्थी घडले आहेत.

या सर्व माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणी अनुभवता याव्यात, या उद्देशाने *रविवार दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत* महाविद्यालय परिसरात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा ज्ञानसाधना माजी विद्यार्थी संघ आणि महाविद्यालय व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.

स्नेह मेळाव्यात *बॉक्स क्रिकेट सामने, कॅरम स्पर्धा, कॅराओके सेशन, विविध फन गेम्स* अशा मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, माजी विद्यार्थ्यांकडून *फूड स्टॉल्स* देखील उभारण्यात येणार आहेत.

*१९८० ते २०२५* या कालावधीत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ज्ञानसाधना माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. “जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याची संधी साधावी तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी पुन्हा ताज्या कराव्यात,” असेही त्यांनी नमूद केले.

या स्नेह मेळाव्यासाठी नावनोंदणी करण्यासाठी संयोजन समितीचे सदस्य ऋषीकेश म्हात्रे (मो. 9819845680) व शंकर कोकाटे (मो. 7506898437) यांच्याशी संपर्क साधावा.

IPRoyal Pawns