महाराष्ट्र गांxx x अवलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. शिवसेना घाबरणार नाही “अब झुकेंगे नहीं ठोकेंगे” – संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे.
भाजपचं लोक मला तीन वेळा भेटले. त्यांनी वारंवार मला सांगितले की तुम्ही मध्ये पडू नका. आमचं सरकार येण्यासाठी मदत करा. जर तुम्ही काही लोकांनी मदत केली नाही. तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, अशा धमक्या देण्यात आल्या, हे सरकार पडणार नाही हे जेव्हा त्यांना मी सांगितले तेव्हा माझ्या नातेवाईकांवर धाडी पडल्या. तिहार जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या, असा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.
ही सुरुवात शिवसेना भवनातून झाली असून शेवट ईडीच्या कार्यालयासमोर होणार असल्याचा
इशाराही संजय राऊतांनी दिला आहे. ईडीच्या लोकांनी मी जिथे कपडे शिवले तेथेही तपास केला.
फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये २५ हजार
कोटींचा घोटाळा झाला.
राजकारणात एक मर्यादा असते, पण ती मर्यादा ओलांडली गेली आहे. आम्ही खूप सहन केले, पण आता त्यांना उद्ध्वस्त करणार आहोत. महाराष्ट्रातसुद्धा सरकार आहे आणि हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वातील आहे हे लक्षात घ्या. पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन जण कोठडीत जातील, असा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला. तुम्ही चुकीच्या लोकांशी पंगा घेतलाय. बाहेरची लोकं आमच्या घरात घुसणार. आमच्या बायका मुलीकडं बघणार. आणि भाजप टाळ्या वाजवणार. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. हे सरकार पडणार नाही हे जेव्हा त्यांना सांगितले तेव्हा माझ्या नातेवाईकांवर धाडी पडल्या.
किरीट सोमय्यांचा मुलगा राकेश वाधवानचा पार्टनर असल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. निकॉन इन्फास्ट्रक्चर कंपनी किरीट सोमय्यांची मुलाची असल्याची माहिती राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना तातडीने अटक करा, अशी मागणी त्यांनी केली. किरीट सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराच्या कागदपत्रे तीन
वेळा मी ईडी कार्यालयात पाठविली आहेत. किरीट सोमय्या ईडी कार्यालयात खिचडी खात बसलेला असतो. किरीट सोमय्या ईडीचा दलाल आहे.
मला जेलमध्ये टाका. पण माझ्या कुटुंबियांना, नातेवाईकांची सतावणूक कशासाठी? असा सवाल त्यांनी केला. हा ट्रेलर आहे यापुढे मी व्हिडिओ, क्लिप्स घेऊन येणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.