शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुलचा फिलिपाईन दौरा : आंतरराष्ट्रीय शैक्षणिक करार (MoU) व विशेष सन्मान
ठाणे,
शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद विश्व गुरुकुल संस्थेच्या वतीने सचिव डॉ. प्रा. प्रदीप ढवळ आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक समन्वयक, शास्त्रज्ञ व वक्ते डॉ. प्रतीक मुणगेकर (डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे शिष्य) यांनी फिलिपाईन दौऱ्यात विविध शासकीय विद्यापीठांना भेट देऊन शैक्षणिक सामंजस्य करार (MoU) केले.
या दौर्यात फिलिपाईनच्या मंत्री सौ. मार्गरेटा बिलास्टोरेस यांच्याशी शैक्षणिक देवाणघेवाण, संशोधन व “शैक्षणिक विषाणू” (Academic Virus) यावर चर्चा झाली. त्यांनी भारत व फिलिपाईन दरम्यान शैक्षणिक ब्रिज उभारण्याचे आश्वासन दिले.

✨ शैक्षणिक करारांची ठळक वैशिष्ट्ये :
1. 11 सप्टेंबर 2025 – Bulacan State University (Philippines):
प्रेसिडेंट डॉ. अँड्रेस यांच्या उपस्थितीत विद्यार्थी देवाणघेवाण, सुरक्षात्मक सहकार्य, संयुक्त परिषद, संयुक्त प्रमाणपत्र कार्यक्रम व सांस्कृतिक देवाणघेवाण यावर करार.
2. 11 सप्टेंबर 2025 संध्याकाळी – सेन वॉल, मनीला:
चेंग वांग हायस्कूलसोबत MoU.
K–12 आंतरराष्ट्रीय शैक्षणिक विकास कार्यक्रमावर भर.
3. 12 सप्टेंबर 2025 – Bataan Peninsula State University (Bataan):
प्रेसिडेंट डॉ. रुबी संतोस मतीबाग व अधिकारी यांच्या उपस्थितीत करार.
नर्सिंग, विधी, संशोधन, क्रीडा, साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य.
आंतरराष्ट्रीय रिलेशन ऑफिसर डॉ. लुब्रिनो यांनी प्रत्यक्ष पाहणी करून भारतातील विद्यापीठांसाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
4. आंतरराष्ट्रीय सहकार्य ( Phillipines/USA):
Fundamental Baptist School of Theology & Texas Bible College, USA सोबत करार.
रिसर्च कॉन्फरन्स, फॅकल्टी डेव्हलपमेंट व संशोधनावर विशेष भर.
🎓 मानाचे सन्मान :
या दौर्यात विद्यापीठाने डॉ. प्रदीप ढवळ यांना –
Honorary Doctor of Literature
Honorary Professor पदवी
तसेच सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक कार्यासाठी Special Excellence Award ने गौरविले.
✨ उपस्थित मान्यवर :
या ऐतिहासिक प्रसंगी आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाचे अधीक्षक श्री. आकाश ढवळ, आंतरराष्ट्रीय समन्वयक श्री. कल्पेश जाधव, पुण्याचे श्री. रतिलाल बाबेल व सौ. अक्षदा बाबेल तसेच श्री. तानाजी वामन उपस्थित होते.
🏆 विशेष ठळक मुद्दा :
ठाणे जिल्ह्यातील पहिली संस्था म्हणून, मुंबई विद्यापीठ, UGC मार्गदर्शक तत्वे व नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP–2020) अंतर्गत आंतरराष्ट्रीय करार करणारी संस्था म्हणून शारदा एज्युकेशन सोसायटीचा हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
या यशामुळे संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी वर्गामध्ये विशेष आनंद व अभिमानाचे वातावरण आहे.





























