जल्लोषात रंगली बोलीभाषा एकांकिका स्पर्धा…

Oplus_16908288

जल्लोषात रंगली बोलीभाषा एकांकिका स्पर्धा…
(‘पाकिस्तानचं यान’ एकांकिका सर्वोत्कृष्ट)

‘सुप्रिया प्रॉडक्शन’तर्फे घेण्यात येणाऱ्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या जल्लोषात रंगली. या फेरीत एकूण सात एकांकिका सादर झाल्या. त्यातून ‘नाट्यांकुर’ या संस्थेची ‘पाकिस्तानचं यान’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. ‘सत्य’ (द्वितीय), ‘पाकळ्या’ (तृतीय) आणि प्रेक्षक पसंती एकांकिका म्हणून ‘डिझाईन’ या एकांकिकांना पारितोषिके मिळाली.
मालवणी, घाटी, माणदेशी अशा विविध बोलीभाषांतील एकांकिका यावेळी सादर
झाल्या.
रंगकर्मी मिलिंद शिंदे, मंगेश सातपुते व संदीप रेडकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष होते.

YouTube player
YouTube player
IPRoyal Pawns