तरुणाईला आपल्या डिस्कोवर आधारित संगीताने थिरकायला लावणारे, अंगावर प्रचंड सोने घालणाची हौस असणारे बप्पीदा अर्थत बप्पी लाहिरी (६९) यांची आज मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली, त्यांना ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया या रोग झाला होता.
दरम्यान, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर
बप्पी दा यांच्या रुपात आणखी एक दिग्गज कलाकार या कलाजगतानं गमावला. या बातमीवर बॉलिवूड आणि संगीत जगतातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
१९७०-८० च्या दशकात बप्पी लहरी यांनी बॉलिवूडमध्ये त्यांची जादू आणि दमदार कामगिरी दाखवून दिली.’चलते चलते’,’डिस्को डांसर’,’शराबी’ हे त्यांनी संगीत दिलेले काही लोकप्रिय चित्रपट.
बप्पी दा साधारण एक महिन्यापासून रुग्णालयात होते. सोमवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यातही आलं. पण ,प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
बप्पी लहरी यांना अनेक व्याधींनी ग्रासलं होते अस म्हटलं जात आहे.