आज जागतिक रंगभूमीच्या दिनी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात नियामक मंडळाची सभा होणार असे नाट्यपरिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी सर्व नियामक मंडळ सदस्यांना मेसेज केले होते या आशेने वेगवेगळ्या विभागांचे नेतृत्व करणारे नियामक मंडळ सदस्य सभेमध्ये येऊन आपले विचार मांडण्यासाठी उत्सुक होते मात्र कोरोनाचे कारण पुढे करून ही सभा प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी रद्द केली या सातत्याने चालू असलेल्या अनागोंदी कारभार बद्दल आणि एकाधिकारशाही बद्दल चीड व्यक्त होत असून मंडळाच्या बहुतांशी सदस्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून त्यांनी शरद पोंक्षे यांचा निषेध केला आहे असे वीणा लोकूर यांनी पत्रकारांना व्हाट्सअप वर पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
चौकट
【 एका पत्रकाराने नाट्यपरिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांना पवार साहेबांनी नाट्यपरिषदेचा ताबा नवीन अध्यक्षांकडे सोपवावा असे पत्र लिहिले आहे त्याचे काय? असे विचारता मंगेश कदम यांनी मा. पवार साहेबांच्या पत्रात ,
…. ‘ताबा दयावा ‘ यापूढ़े, ‘*असे आम्हास वाटते ‘ असं साहेबानी वाक्य पूर्ण क़ेलं आहे . त्यानी फक्त *सूचवलं * आहे .
ताबा द्यावा , असा *आदेश* नाही दिलेला. असे उत्तर त्या पत्रकारास दिले.】
नाट्यपरिषदेचे सह कार्यवाह सतीश लोटके आपल्या निषेधाच्या पत्रात म्हणतात ” अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १८ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या नियामक मंडळ सभेत प्रसाद कांबळी यांना पदच्युत केले आहे. सध्या परिषदेचे विद्यमान अध्यक्ष श्री. नरेश गडेकर आहेत. कोणतेही बहुमत नसलेले कांबळी जोरजबरस्तीने, कार्यालयात येऊन बसत आहेत. परिषदेचे कामकाज खुर्चीला चिटकवून बसणारांमुळे ठप्प झाले आहे.
त्यात १ वर्षे परिषदेकडे न फिरकलेले, परिषदेचं काडीचही काम न केलेले प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे, परिषदेच्या लेटरहेडवर मानहानी होईल असे विश्वस्तांना पत्र पाठवून तहहयात विश्वस्तांचा अपमान करत आहेत.
नियामक मंडळाने सभेची घटनेप्रमाणे मागणी केली तरीही सभा न घेणारे पोंक्षे व सभा होऊ नये यासाठी कोर्टात जाणारे प्रसाद कांबळी. कोर्टाने अर्ज फेटाळला, बहुमत नाही तरीही खुर्चीला चिटकून बसलेले, परिषदेचे काहीही काम न करणारे शरद पोंक्षे व नवनाथ (प्रसाद) कांबळी यांचा जाहीर निषेध.
महाराष्ट्रभरातील बहुतांश नाट्यगृह सुरू झाली. परंतु नाट्यकर्मी सभासदांच्या मालकीचे , रंगभूमीच्या मध्यवर्ती संघटनेचे यशवंत नाट्यसंकुल अद्याप सुरू नाही.
यावर कांबळी, पोंक्षे , मंगेश कदम ( जो परिषदेचा प्रवक्ता म्हणून मिरवतो, तो सध्या प्रवक्ता नाही. आणी घटनेत प्रवक्ता हे पद सुध्दा नाही) म्हणतात फायरची परवानगी नाही. २००५ पासून परवानगी काढलेली नाही. विश्वस्त शशी प्रभू यांना अनेक वेळा विचारून ते ऊत्तर देत नाहीत. असे विधान यांनी केलेले आहे. वास्तविक फायरची परवानगी एकदाच मिळते. ती २००५ साली मिळालेली आहे. प्रतीवर्षी फायर आँडीट करून नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते.
वास्तविक प्रसाद कांबळी अडीच वर्षे अध्यक्ष होते. प्रमुख कार्यवाह पोंक्षे यांचा आणी नाट्य परिषदेच्या कामाचा संबंध नसला तरी प्रमुख कार्यवाह यापदावरून अडीच तीन वर्षात फायरचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता नाट्यसंकुल कसे चालविले?
कांबळी व पोंक्षे म्हणतात मागील पदाधिकाऱ्यांनी फायरची परवानगी घेतली नाही, हे अर्धसत्य आहे.
हा सगळा खेळ खुर्चीसाठी आहे. काहीही होवो, परिषद बंद पडली तरी चालेल, आमच्याकडे बहुमत नसलं तरी चालेल, पण खुर्ची सोडायची नाही.
नियामक मंडळ सदस्यांनी घटनेप्रमाणे मागणी करूनही प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी सभा आयोजित केली नाही. तसेच दि.१८ फेब्रुवारी २०२१ ची नियामक मंडळ सभा होऊ नये म्हणून प्रसाद कांबळी सिव्हिल कोर्टात गेले . तिथेही त्यांचा अर्ज फेटाळला. आणी त्याच सभेत कांबळी यांना पदच्युत केले.
निकाल विरोधी गेल्यामुळे पोंक्षे यांनी १७ फेब्रुवारी २०२१ रोजी २७ मार्च रोजीची सभा आयोजित केली. परंतु नियामक मंडळाने अध्यक्ष बदल करून श्री. नरेश गडेकर यांची हंगामी अध्यक्षपदी निवड केली. दि. २७ मार्च रोजीची सभा श्री. गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार व या सभेतही आपली डाळ शिजणार नाही, आणी तहहयात विश्वस्त मा. शरद पवार साहेब, शशी प्रभू यांनी दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या सभेत झालेल्या निर्णयांची त्वरित अमंलबजावणी करून तातडीने नियामक मंडळ सभा आयोजित करावी असे निर्देश प्रमुख कार्यवाह पोंक्षे यांना दिले आहेत. यासर्व बाबीं मुळे दि.२७ मार्च २०२१ रोजीची नियामक मंडळ सभा कोरोनाच्या नावाखाली रद्द केली. याचा बहुतांश नियामक मंडळ सदस्यांनी जाहीर निषेध केला आहे.
ज्या पोंक्षेंंचा नाट्य परिषदेच्या कामकाजाशी कधीच संबंध आला नाही. जे पोक्षें दोन वर्षातील १ वर्षेभर गैरहजर होते, त्यांनी इतरांना पदावरून काढण्याचे ऊद्दोग करू नयेत. प्रसाद कांबळी सोडता आजअखेर कोणत्याही पदात काहीच बदल झालेले नाहीत. हे अधिकार फक्त नियामक मंडळाला आहेत.
शरद पोंक्षे यांच्या मनमानी कामकाजाचा मी सहकार्यवाह म्हणून जाहीर निषेध करतो.
शरद पोंक्षेंच्या अश्या घटना विरोधी कामकाजामुळे लवकरच घटनेप्रमाणे त्यांनाही पदावरून दुर करण्यासाठीची प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी मी नियामक मंडळास करित आहे.
नाट्य परिषदेचे सध्या अधिकृत प्रवक्ते मंगेश कदम नाहीत. कोणतीही सभा अनेक दिवसांपासून झालेली नाही. सभेत झालेल्या निर्णयांची माहिती देणं हे काम प्रवक्तांचे. मंगेश कदम हे परस्पर परिषदेची चुकीची माहिती देत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेऊ नये.
*दि.२७ मार्च रोजीची सभा रद्द केल्यामुळे शरद पोंक्षे यांचा जाहीर निषेध.*”