‘दरमहा शंभर कोटी रुपयांची मागणी’ मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप

‘दरमहा शंभर कोटी रुपयांची मागणी’ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती असा अतिशय खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परामबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल यांना पत्रा द्वारे केल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.

दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांनी केलेले आरोप फेटाळतांना “मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट
होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला
वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.” असे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

परमबीर सिंह यांचे पत्र धक्‍ककादायक आणि खळबळजनक आहे. एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने असे पत्र गृहमंत्र्यांबद्दल लिहिण्याची देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ असलयाचे फडणवीस म्हणाले. या पत्रासोबत एक चॅटही जोडली असून गृहविभागात नियुक्ती किंवा बदलीबद्दल जे काही घडत होते, त्याचा हा कळस असलयाचा आरोप फडणवीस यांनी केला. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns