शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, ३१ मार्चला होणार शस्त्रक्रिया

जेष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले असता त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे समजल्याने त्यांची अंडोस्कोपी झाल्यानंतर त्यांच्यावर ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
त्याचप्रमाणे आजपासूनचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं.

IPRoyal Pawns