कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येणाऱ्या आनंदवनात सोमवारी बाबा आमटे यांची नात डॉक्टर शीतल आमटे-करजगी ( ४१) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे पूर्ण आनंदवन हादरले आहे.
डॉक्टर शितल यांनी सकाळी स्वतालाच विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. आनंदवनातच डॉक्टर शितल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आनंदवन च्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी म्हणून शितल काम करत होत्या. डॉक्टर शितल या काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या असे कुटुंबाने चार दिवसापूर्वी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात स्पष्ट केले होते, डॉक्टर शीतल आमटे यांच्या मृत्यू संदर्भात सध्यातरी घाईने काहीही भाष्य करणे बरोबर होणार नाही असे चंद्रपुर चे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले.
































