१९ सप्टेंबर पासून बिग बॉस सिझन ३ कलर्स मराठीवर येत आहे त्यानिमित्त आयोजित आभासी पत्रकार परिषदेत बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकर…..
¬“हो, हा तिसरा सिझन असला तरी आजही मला प्रत्येक वेळी कॅमेराला समोरे जाताना दडपण येते आणि हे दडपण नाही ठेवले तर अति आत्मविश्वास होईल, कोणत्याही अभिनेत्याने पोटात गोळा ठेवूनच काम करावे असे माझे ठाम मत आहे. सिझन तिसरा सुरु होण्याअगोदर मी आजारी पडलो आणि हा सिझन मी करू शकेन कि नाही हा माझ्या समोर प्रश्न पडला, मात्र तो जो सर्वांचा बिग बॉस वरती बसलाय त्याने मला ताकत दिली आणि मी या आजारातून बाहेर पडलो तसा मी जिद्दी आहे, बिग बॉसचे प्रोमो करताना मला लावलेल्या सगळ्या नळ्या काढून काही प्रसंगी लपवून मी शुटींग केले.” महेश मांजरेकर ‘मुंबई न्यूज’ शी बोलत होते.
मांजरेकर पुढे म्हणाले “करोनाच्या संकटाला आपण खबरदारी घेवून सामोरे जाणे महत्वाचे आहे. लोक म्हणतात शो मध्ये मी खूप रागावतो, पण आता मला माझ्या रागावर थोडे नियंत्रण ठेवले पाहिजे. मी मनाने तेवढा मजबूत नाही आहे मी हळव्या स्वभावाचा आहे आणि म्हणूनच मी लगेच प्रतिक्रिया देतो.
बिग बॉस हे काही पटकथा लिहून सादर केले नाही आहे ती एक त्या वेळी घडलेली प्रतिक्रिया आहे.
हिंदीतील मोठे स्टार आणण्यापेक्षा मी मराठीत हुशारी असलेली माणसे आणीन कारण मी थोडासा माजोरडा मराठी आहे. मला नितीन गडकरींना बोलवायला आवडेल.
सर्वजण मला विचारतात या सिझन मध्ये नवीन काय आहे नक्कीच काहीतरी नवीन असणार आहे पण ते सरप्राईज असेल. चावडीवरील वावड्या हे आकर्षण असणार आहे मात्र नक्की ते काय आहे हे तुम्हाला लवकरच समजेल.”
“बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत” हे वाक्य आणि हा दमदार आवाज महाराष्ट्राच्या घरारात घुमला. असं घर ज्याने आपल्या सगळ्यांची मनं जिंकली. एक असा कार्यक्रम ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला आपलसं केलं. ज्या कार्यक्रमाची उत्सुकता महाराष्ट्राला गेल्या दोन वर्षांपासून होती. ज्या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांनी आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ज्या घराने सदस्यांची अनेक रूपं पाहिली, आव्हानांसाठी सदस्यांमध्ये रंगलेली चुरस पाहिली. सदस्यांच्या प्रत्येक कृतीचे जे घर साक्षीदार राहिलं. ज्या घराने सदस्यांचे मुखवटे काही दिवसांतच उतरवले आणि त्यांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणला, असं घर जे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं. ते घर आता परत येत आहे खर्या अर्थाने एंटरटेनमेंट अनलॉक करायला. कलर्स मराठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन 3. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून आपण एक प्रकारची मरगळ, उदासिनता अनुभवत आहोत. पण आता खर्या अर्थाने मनोरंजनाचा तडका लागणार. जेव्हा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये साठहून अधिक कॅमेरांच्या नजरकैदेत १५ सदस्य असणार. घरातील सदस्य आणि बाहेरील जग यामधील दुवा म्हणजे कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. मागील दोन्ही पर्वांमध्ये आपल्या सूत्रसंचालनाच्या अनोख्या पध्दतीमुळे आणि दमदार व्यक्तिमत्वामुळे प्रेक्षकांची मने जिंकणारे आणि मराठी माणसाला नेहेमीच आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर याही पर्वात सुत्रसंचालकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणार आहेत.
बिग बॉस मराठी सिझन 3 साठी Broke Bond Red Label प्रस्तुतकर्ते म्हणून सहभाग आणि विशेष प्रायोजक म्हणून TRESemme A23 आणि HAIER यांचादेखील सहभाग. एंडेमॉल शाइन इंडिया निर्मित Broke Bond Red Label प्रस्तुत बिग बॉस मराठी सिझन 3 एका दिमाखदार सोहळ्याद्वारे १९ सप्टेंबर रोजी संध्या. ७.०० वा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानंतरचे भाग सोम ते रवि रात्री ९.३०वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर प्रक्षेपित होतील. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांची धम्माल मस्ती, एकमेकांबद्दल करत असलेले गॉसिप याबद्दल तरूणपिढी मध्ये खूपच उत्सुकता असते यावेळेस पहिल्यांदा हे २४ तास VOOT वर बघायला मिळणार आहे. तसेच प्रेक्षक त्यांचे प्रश्न सदस्यांना “तुमचे प्रश्न” आणि संदेश चुगली बूथद्वारे पाठवू शकणार आहेत. कार्यक्रमाचे मूळ भाग प्रेक्षक कधीही VOOT बघू शकतात.
नवं घर नवीन सदस्यांनी सजणार महाराष्ट्रात एंटरटेनमेंट अनलॉक होणार !, आणि बिग बॉस मराठी सिझन तिसरा ‘चावडी’ वर रंगणार
+1
+1
+1
+1